शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडले!

By admin | Updated: April 10, 2016 01:40 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; पाटबंधारे विभागाने दिली पोलिसांकडे तक्रार.

देउळगाव साकर्शा (बुलडाणा): भुईमुगाच्या पिकाला पाणी देण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाने पूर्ण न केल्याने, शेतकर्‍यांनी उतावळी प्रकल्पाचे कुलूप तोडून पाणी सोडल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.शेतकर्‍यांना भुईमुगाच्या पिकाची चिंता भेडसावत आहे. मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील उतावळी प्रकल्पामध्ये डिसेंबर २0१५ मध्ये १0.७२ दलघमी पाणी साठा उपलब्ध होता. त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी परिसरातील २00 शेतकर्‍यांची बैठक घेऊन, उतावळी धरणातून 0.५0 दलघमी आरक्षीत पाणी भुईमुगाच्या पिकासाठी सोडून उर्वरित पाणी शेतकर्‍यांना देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी संबंधित शेतकर्‍यांकडून ८0 हजार रुपयांचा भरणाही अधिकार्‍यांनी करून घेतला होता; परंतु कराराप्रमाणे पाणी मिळत नसल्याने पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने जवळपास १५0 शेतकर्‍यांनी धरणाच्या दरवाजाचे कुलूप तोडून पाणी घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. खामगाव पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एन.टाले यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पंचनामा केल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.