शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी

By admin | Updated: May 17, 2016 02:04 IST

परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे.

वडापुरी : परिसरात गेल्या पाच- सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आहे. यामुळे पिण्याचे पाणी व चारा यांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हैराण झाला आहे. एकीकडे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, तर दुसरीकडे चारादेखील शिल्लक नसल्याचे चित्र आहे. जनावरांच्या चाऱ्याच्या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे पडीक पडलेल्या शेतात मुक्या जनावरांवर कोसकोस फिरून वाळलेला चारा खाण्याची वेळ आली आहे. वडापुरी, अवसरी, काटी, पंधारवाडी, वरकुटे, अभंगवस्ती, राजगुरुवस्ती, विठ्ठलवाडी या परिसरात ज्वारी, गहू, मका, ऊस इत्यादी पिके मोठ्या प्रमाणत घेतली जातात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून या भागात पुरेसा पाऊसच पडला नाही. त्यामुळे विहिरींना पाणीसुद्धा शिल्लक राहिले नाही. यामुळे मोठा दुष्काळ पाहावयास मिळाला. पाऊस पडला नसल्याने या वर्षी तर ९० टक्के शेतकऱ्यांनी शेतात पिकेच घेतली नाही. पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे शेतातील बाटूकसुद्धा निघाले नाही. त्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. >जनावरे सोडली मोकळीसध्या या परिसरातील शेतकरी चारा उपलब्ध नसल्याने पडीक असलेल्या शेतीमध्ये जनावरांना मोकळे सोडून देत आहेत. काही प्रमाणात वाळलेला चारा आहे तो तरी खाऊन पोट भरेल म्हणून जनावरांना मोकळे सोडत आहे. पाऊस पडेपर्यंत पशुधन जगवावे कसे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चाऱ्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याने दूध धंदासुद्धा कमी झाला आहे.