शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी

By admin | Updated: October 20, 2016 17:29 IST

परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २० : परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जादा पैसे देऊनही मजूर काम करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा या परिसरातील खरिप हंगाम पावसाअभावी ६० ते ७० टक्के वाया गेला. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार, असे भाकीत केले होते. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नाही.

जेमतेम जगविली पिके पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जेमतेम पिके जगविली. काहींनी बाहेरून पाण्याचे टॅँकर आणून सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र, आता जी पिके चांगल्या स्थितीत आहे, ती कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची दमछाक खरीप शेती हंगाम हंगाम आवरण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांची तोडणी, बांधणी व कापणीचे काम शेतकऱ्यांना स्वत: करावे लागत असल्यामुळे त्यांची दमछाक होताना दिसत आहेत. सद्य:स्थितीत बागायत व कोरडवाहू जमिनीचा हंगाम आवरण्यास एकाच वेळेस सुरुवात झाली आहे. तसेच याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या देखील प्रथम सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुुळे मुलांनी शेती कामाकडे पाठ फिरविली आहे. या सर्व कारणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.

दिवसाचे दोनशे रुपये त्यात आता महागाई वाढल्यामुळे मजुरांनी त्यांच्या मजुरीतही वाढ केली आहे. सकाळच्या सत्रात काम केले तर शेतकऱ्यांना मजुराला दीडशे रुपये द्यावे लागतात व सकाळ व दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांनी काम केले तर दिवसाचे २०० रुपये द्यावे लागतात. त्यात शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल मार्केटपर्यंत आणण्यासाठी मोठा खर्च लागत असल्यामुळे जादा मजुरी देणे मजुरांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आलेला दिसत आहे.