शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संप - उच्चस्तरीय मंत्रिगट करणार शेतकरी नेत्यांशी चर्चा

By admin | Updated: June 9, 2017 18:54 IST

शेतकऱ्यांच्या भावनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय..

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 9 - काही दिवसांपासून राज्यात कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. राज्य सरकारने महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली असून हा गट राज्यातील शेतकरी नेत्यांशी चर्चा करेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांशी पाठीशी राहील. शेतकरी संकटात आहे, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आदी मुद्यांवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिगटात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष महाजन आणि शिवसेनेचे दिवाकर रावते (परिवहनमंत्री) यांचा समावेश आहे. हा गट राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी सर्व मागण्या, सूचना यावर चर्चा करेल. आणि त्यांचा अहवाल सादर करेल. कोणताही प्रश्न संवादानेच सुटू शकतो, असा आपला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.