शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारण कार्यालयात शेतकरी महिलेने स्वत:ला पाच तास घेतलं डांबून

By admin | Updated: August 30, 2016 18:34 IST

एका शेतकरी महिलेने मंगळवारी आपल्या बहिणीसह स्वत:ला येथील लघू सिंचन विभागाच्या कार्यालयात तब्बल पाच तास डांबून घेतले

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 30 - साठवण तलावासाठी अधिग्रहण केलेल्या शेतीचा वाढीव मोबदला देण्यासाठी लघू सिंचन विभाग टाळाटाळ करीत असल्याने त्रस्त एका शेतकरी महिलेने मंगळवारी आपल्या बहिणीसह स्वत:ला येथील लघू सिंचन विभागाच्या कार्यालयात  तब्बल पाच तास डांबून घेतले. या घटनेने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले. पाच तासांच्या कसरतीअंती सदर शेतकरी महिलेला बाहेर काढण्यात यश आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.प्राप्त माहितीनुसार, देवळी तालुक्यातील हिवरा येथील उमाकांता भानू राऊत व त्यांची बहिण सुनंदा वासनिक यांच्या मालकीच्या सुमारे ९ एकर शेतीचे साठवण तलावासाठी लघू सिंचन (जलसंधारण) विभागाच्यावतीने अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी त्यांना मोबदल्यापोटी १ लाख ३६ हजार रुपये मिळाले. दरम्यानच्या काळात निम्म्या म्हणजेच ४.५० एकर शेतीचा वाढीव मोबदला उमाकांता राऊत यांची बहीण सुनंदा यांना मिळाला. उमाकांता राऊत यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. यानुसार २०१२ पर्यंत ७ लाख ४५ हजार ६१४ रुपये आणि २०१६पर्यंत त्यावरील व्याज, अशी सुमारे १३ लाखांपेक्षा अधिक रक्कम मोबदला म्हणून उमाकांता राऊत यांना लघू सिंचन विभागाकडून मिळणे अपेक्षित होते. याबाबत राऊत यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र उपयोग झाला नाही. अखेर आज सकाळी ११.३० वाजता उमाकांता राऊत यांनी भगीणी सुनंदा वासनिक यांच्यासह वर्धा येथील लघू सिंचन विभागाचे कार्यालय गाठले. आणि आपल्या सुनंदासह स्वत:ला कार्यालयात डांबून घेतले. या घटनेने सदर विभाग चांगलाच हादरला. दोघींची सुटका करण्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांची समजूत घालण्याचा पूरेपूर प्रयत्न झाला. मात्र उमाकांता मोबदल्याच्या  मागणीवर ठाम होत्या.तब्बल ४.३० वाजतापर्यंत संबंधित अधिकारी उमाकांता यांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर रक्कम मिळवून देण्याची ग्वाही देताच त्यांनी आपली सुटका केली. यानंतर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दोघी बहिणींना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले असता निवास उपजिल्हाधिकारी जोशी यांनी याबाबत त्यांची नागपूर येथील लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता  यांच्याशी चर्चा घडवून आणली. तेव्हा येत्या पंधरवड्यात वाढीव मोबदला मिळून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर शहर पोलिसांनी दोन्ही भगिणींना शहर ठाण्यात नेले. त्यांच्यावर शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी कारवार्ई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.