शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

फांद्या शेतात टाकल्याच्या वादातून शेतकऱ्याची हत्या

By admin | Updated: July 7, 2015 05:04 IST

शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला़

अंथुर्णे (पुणे) : शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला़ नामदेव गंगाराम पोरे (वय ५८) असे त्याचे नाव आहे़ सुरुवातीला पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नामदेव पोरे यांचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसात तांत्रिक अडचणीमुळे रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाळू पोरे व पांडुरंग पोरे यांना अटक केली आहे. याबाबत पोरेवाडी येथे राहणारे दादा नामदेव पोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोरे यांचे शेळगाव हद्दीत शेत (गट नंबर १५५०) आहे. यात ५ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारचे शेतकरी बाळू बापू पोरे याने बांधावर असणारे गवत व सुबाभळीच्या फांद्या उपटून दादा पोरे यांच्या शेतात टाकल्या. त्याची विचारणा दादा पोरे यांचे वडील नामदेव गंगाराम पोरे, आई जनाबाई नामदेव पोरे यांनी केली. त्यानंतर वाद झाल्याने बाळू बापू पोरे याने नामदेव पोरे यांच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने जबरी वार केले. तर पांडुरंग बापू पोरे याने जनाबाई नामदेव पोरे यांना काठीने मारहाण केली. मंगल बापू पोरे हिने शिवीगाळ व दमदाटी केली. या मारहाणीत नामदेव पोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ६ जुलैला त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)