शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संपात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने तोडली डाळिंब बाग

By admin | Updated: May 28, 2017 13:50 IST

निफाड तालुक्यातील दिक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंब बाग आज सकाळी तोडली.

ऑनलाइन लोकमत

पिंपळगाव बसवंत (नाशिक), दि. 28 - निफाड तालुक्यातील दिक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंब बाग आज सकाळी तोडली.दिक्षी येथील हेमंत चौधरी हे पदवीधर शेतकरी असून त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती करण्यास सुरूवात केली. सन २०१३ पासुन नवीन काही तरी शेतीत करावे या उद्देशाने डाळिंब बाग लावली. सुरवातीला तीन एकर डाळिंब लावले. शासनाच्या फळरोप वाटीकेतुन भगवा जातीचे रोपे घेतली मात्र सदरचे रोपेही अत्यंत कमी दर्जाचे व भेसळ निघाल्याने एक वर्ष वाया गेले. या भागात गेली दहा वर्षे कृषी सहायय्यक नसल्याने शेततळे हे स्वत:चे खर्चाने केले. वीस लाख रु पये स्व:त खर्च करून पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभे केले तसेच डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ केली. मात्र दरवर्षी उत्पादनवर आधारित बाजारभाव मिळत नव्हता. शेतकरी व ग्राहक यांच्या भावात मोठी तफावत होती. दरवर्षी भावात होत असलेली घसरण तसेच व्यापाऱ्यांनी घेतलेला माल व ग्राहकाला विकलेला यात फार मोठा फरक पडत होता. उत्पादनावर आधारित आजपर्यंत दर हा मिळाला नाही. उलट उत्पादन घेताना दरवर्षी खर्च वाढत गेला. त्यामुळे दरवर्षी तोट्यात चाललेला शेती व्यवसायाला वैतागून तसेच सर्व शेतकरी वर्गानी एक तारखेचा संपाचा निर्णयावरून फक्त स्वत: पुरतेच पिकवायचं यासाठी तीन एकर डाळींब तोडण्याचा निर्णय घेतला.  ------------------------------------२० एकर डाळिंब  व १४ एकर द्राक्ष शेती आहे. तो प्रत्येक वर्षी थोडे थोडे बाग कमी करून स्वत: ग्राहकांपर्यंत पोहोचविण्या प्रयत्न करणार असून व्यापारी व अडतदार, दलाल यांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थाबण्यिाचा प्रयत्न करणार आहे.- हेमंत चौधरी, दिक्षी, नाशिक