शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक, मंत्रालयाच्या गेटवर फेकला डाळ-कांदा

By admin | Updated: May 2, 2017 17:00 IST

संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी बळीराजा संघटनेचे कार्यकत्यांनी मंत्रालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी बळीराजा संघटनेचे कार्यकत्यांनी मंत्रालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतक-यांनी तूर डाळ, कांदे आणि केळी रस्त्यावर फेकून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
 
एकीकडे शेतकऱ्यांकडील तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत, खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढला आहे.  या सर्वात भर म्हणून गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  
 
अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे पिचलेल्या शेतक-यांनी मंत्रालयाच्या आवारात डाळ, कांदा फेकून आपला राग व्यक्त केला. दरम्यान, यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलनकर्त्या शेतक-यांना ताब्यात घेतलं. 
 
 
दरम्यान, शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नसल्याने मुलांचे शिक्षण, मुलींची लग्नं आणि उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी संकटात सापडले आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत तूरडाळ भेट पाठवून संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा मांडली. सोमवारी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, ज्येष्ठ शेतकरी नेते पां.जा. विशे, एकनाथ वेखंडे आदी मान्यवर मंडळी होती.
 
तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळ आणि शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने संकटात सापडले असून शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च मिळणेदेखील दुरापास्त झाल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी गरजेची आहे. आधीच पिचलेले शेतकरी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे आणखी अडचणीत येणार आहे.
 
या महामार्गात शेतकऱ्यांची हजारो हेक्टर बागायती जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग रद्द आणि शेतीमालाला योग्यभाव याबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंती आमदार बरोरा यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.