शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मोक्याच्या जागा खासगी संस्थांना आंदण

By admin | Updated: June 29, 2016 01:54 IST

महापालिकेबरोबरचा भाडेकरार संपल्यानंतरही तब्बल २४२ भाडेकरूंनी नूतनीकरणासाठी अनेक वर्षे अर्ज केलेला नाही़

मुंबई : महापालिकेबरोबरचा भाडेकरार संपल्यानंतरही तब्बल २४२ भाडेकरूंनी नूतनीकरणासाठी अनेक वर्षे अर्ज केलेला नाही़ पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा संस्था, कंपन्या व व्यक्ती मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा लाभ उठवित आहेत़ यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सचाही समावेश आहे़पालिकेच्या चार हजार मालमत्ता भाडेकराराने खासगी संस्था, कंपन्या आणि व्यक्तींना देण्यात आल्या आहेत़ यापैकी २४२ मालमत्तांचा भाडेकरार संपून अनेक वर्षे लोटली आहेत़, परंतु या कंपन्यांनी अथवा संस्थांनी भाडेकराराच्या नूतनीकरणासाठी पालिकेशी संपर्क साधलेला नाही़ महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा ताबा असलेल्या मे़ रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबबरोबरचा करारही २०१३ मध्ये संपुष्टात आला आहे़ रेसकोर्सची जागा ताब्यात घेऊन पालिकेने त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधावे, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली होती़ मात्र, हा प्रस्ताव शासन दरबारी रेंगाळला आहे़ हा निर्णय होईपर्यंत पालिका प्रशासनाने अन्य २४१ मालमत्तांबाबतही निर्णय लांबणीवर टाकला आहे़ यापैकी काही संस्थांनी इमारतींमध्ये बेकायदा बांधकाम केले असल्यानेच त्या या नूतनीकरणासाठी पुढे येत नसल्याचे बोलले जाते़ (प्रतिनिधी)> चार हजार मालमत्ता भाडेकरारानेपालिकेच्या चार हजार मालमत्ता भाडेकराराने खासगी संस्था अथवा कंपन्यांना दिल्या आहेत़ २४२ संस्था व कंपन्यांबरोबर केलेला करार संपुष्टात आला आहे़ मात्र, अद्याप त्याचे नूतनीकरण झालेले नाही़ यामध्ये माध्यम समूहांची कार्यालये, हॉटेल्स, खासगी, तसेच सरकारी बँकांची कार्यालये व खासगी कार्यालयांचाही समावेश आहे़नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच या संस्था नूतनीकरणासाठी पुढे येत नसल्याने, त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची मागणी नगरसेवकांकडून सुरू आहे़ निश्चित धोरण तयार करावे, असे निर्देश सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी दिले आहेत़