शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याची पूर्वलक्षी अंमलबजावणी

By admin | Updated: July 7, 2016 01:26 IST

घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होतो. त्यामुळे २००५ पूर्वीचे खटलेही या कायद्याच्या कक्षेत येतात, असा निर्वाळ देत उच्च न्यायालयाने या कायद्याअंतर्गत

मुंबई : घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा, २००५ पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होतो. त्यामुळे २००५ पूर्वीचे खटलेही या कायद्याच्या कक्षेत येतात, असा निर्वाळ देत उच्च न्यायालयाने या कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या १९८२ च्या प्रकरणातील पीडितेच्या बाजूने निकाल दिला.‘दुर्लक्षित आणि पतीने नाकारलेल्या किंवा अत्याचार करण्यात आलेल्या महिलांना संरक्षण मिळावे, यासाठी हा कायदा करण्यात आला आहे,’ असे न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाने या वेळी नमूद केले. १९८२ मध्ये पतीने दूर केलेल्या जन्नतबी यांनी २०१० मध्ये पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करत देखभालीचा खर्च मागितला. पुणे सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये त्यांचा अर्ज दाखल करून घेत जन्नतबी यांचा पती गफुर हसन चौगुले यांना दरमहा देखभालीचा खर्च म्हणून १,५०० रुपये देण्याचा आदेश दिला.जन्नतबी यांच्या म्हणण्यानुसार, गफूर आणि त्यांचा डिसेंबर १९७२ मध्ये विवाह झाला. त्यानंतर १० वर्षांतच गफूर यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलीला घराबाहेर काढले. १९८२ मध्ये पतीपासून दूर झालेल्या जन्नतबी यांनी २०१० मध्ये तब्बल १८ वर्षांनी घरगुती हिंसाचारविरोधी कायद्याखाली पतीकडून देखभालीचा खर्च मिळावा, यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आॅक्टोबर २०१० मध्ये दंडाधिकाऱ्यांनी २००५ चा कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केला जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्याने जन्नतबी यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली. पुणे सत्र न्यायालयाने ही तक्रार दाखल करून घेण्यायोग्य आहे, असे म्हटले. फेब्रुवारी २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने गफूर यांना पत्नीला दरमहा १,५०० रुपये देखभालीचा खर्च म्हणून देण्याचा आदेश दिला. गफूर यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. महिलांच्या संरक्षणासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे, हे सत्र न्यायालयाचे निरीक्षण योग्य आहे. त्यामुळे न्यायालयाने यामध्ये अतितांत्रिक असू नये, असे न्या. जाधव यांनी म्हटले आणि जन्नतबी यांची तक्रार दाखल करून घेतली. (प्रतिनिधी)