शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कुटुंबाला हवे इच्छामरण, मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:07 IST

नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले.

 ठाणे : नगरसेवक विक्रांत चव्हाण हे त्यांच्या हस्तकामार्फत खंडणीसाठी आपल्या संस्थेविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप करून एका कुटुंबाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे बुधवारी इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र दिले. स्वाती मेहता असे पत्र पाठवणाºया महिलेचे नाव असून त्यांनी त्यांच्या व त्यांच्या बहिणीच्या कुटुंबातील नऊ जणांचा उल्लेख केला आहे.दरम्यान, नगरसेवक चव्हाण यांनी स्वाती मेहतांचे आरोप फेटाळले आहेत. मी स्वत: वकील आहे. स्वाती मेहता म्हणतात, तशा प्रवृत्तीचामी असतो, तर नागरिकांनी मलातीन वेळा निवडून दिले नसते, असे स्पष्ट करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.मुलुंड येथील स्वाती धवल मेहता यांनी यासंदर्भात मुख्य न्यायाधीश, मानवी हक्क आयोग, महिला आयोग आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी बहीण मेघा गवारे ठाण्यात शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करतात. मेघा यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून साईनाथनगर, भीमनगर, जानकीदेवीनगर आणि गांधीनगर भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सर्वेक्षण केले होते. ही योजना राबवताना त्यांच्याकडून खंडणी उकळण्यासाठी चव्हाण हे अस्लम इसाक शरीक मसलत या त्यांच्या हस्तकामार्फत खोट्या तक्रारी करीत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.सूरज परमार प्रकरणात सहभागबांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणातील चिठ्ठीत चव्हाण यांचे नाव असल्याकडे त्यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. या दबावामुळे न्यायालयाकडून मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणीही त्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे. चव्हाण यांच्याकडून केली जाणारी बदनामी आणि त्यांच्या दबावतंत्राला कंटाळून आपल्या दोन्ही कुटुंबांना सामूहिक इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी मेहता यांनी केली आहे.