शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या

By admin | Updated: February 27, 2017 05:33 IST

इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना, रविवारी दुपारी बॉम्बे रुग्णालयाजवळील रामलाल मेन्शनमध्ये घडली.

मुंबई : एका चार्टड अकाउंटंटच्या (सीए) पत्नीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना, रविवारी दुपारी बॉम्बे रुग्णालयाजवळील रामलाल मेन्शनमध्ये घडली. रूपा विकास शहा (वय ४४) असे त्यांचे नाव असून, या घटनेमागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.व्यवसायाने सीए असलेले विकास शहा व त्यांचे बंधू मेट्रो सिनेमागृहाच्या मागील रामलाल मेन्शनमध्ये पाचव्या मजल्यावर दोन स्वतंत्र टेरेस फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहेत. शहा बंधू कामानिमित्त बाहेर असताना, दुपारी साडेबाराच्या सुमारास रूपा शहा यांनी त्यांच्या दीराच्या फ्लॅटच्या टेरेसवरून उडी मारली. त्या वेळी त्यांचा १३ वर्षांचा मुलगा हा आतल्या खोलीत अभ्यास करत होता, तर पुतण्या जेवण करत होता. दिराची मोलकरीण कपडे धूत होती. तिने आवाजामुळे बाहेर येत पाहिले असता, रूपा शहा या पडल्याचे लक्षात आले. इमारतीच्या वॉचमनच्या मदतीने तातडीने पोलिसांना कळविल्यानंतर, रूपा यांना जीटीमध्ये नेण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.दरम्यान, शहा यांच्या घरी ‘सुसाइड नोट’ अथवा अन्य कोणतीही बाब आढळून आलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या टेरेसला लोखंडी ग्रील असल्याने, त्यांनी दिराच्या टेरेसवरून उडी मारली असावी, असे आझाद मैदान पोलिसांनी सांगितले. घरगुुती वादातून रूपा शहा यांनी हे कृत्य केले असल्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तविण्यात आली. (प्रतिनिधी)