शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यातील कुटुंबास ३९ वर्षांनी जमीन परत मिळाली

By admin | Updated: October 7, 2016 05:40 IST

जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने संपादित केलेली अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथील पाच

मुंबई : जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारने संपादित केलेली अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील विरगाव येथील पाच एकर ४ गुंठे जमीन तेथील वाकचौरे कुटुंबास आता ३९ वर्षांनी परत मिळाली आहे.मार्च १९७७ मध्ये केल्या गेलेल्या या भूसंपादनाविरुद्ध वाकचौरे कुटुंबातील बाबासाहेब, सुनील, बाळासाहेब आणि गंगाधर या सदस्यांनी तीन वर्षांपूर्वी रिट याचिका केली होती. न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल. वडाणे यांच्या औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ती मंजूर केली आणि वाकचौरे यांची जमीन (सर्व्हे नं. ११२/३, हिस्सा नं. ४६३) संपादित करण्याची कारवाई ‘व्यपगत’ (लॅप्स) झाल्याचे जाहीर केले.जमीन कागदोपत्री संपादित केली गेली होती तरी इतकी वर्षे तिचा ताबा वाकचौरे कुटुंबीयांकडेच होता व तेथे ते नियमितपणे शेतीही करीत आहेत. असे असले तरी जमिनीवर ‘संपादित’ असा शिक्का कायम होता. न्यायालयाच्या या निकालाने तो पुसला गेला असून जमिनीची मालकी पूर्णांशाने पुन्हा वाकचौरे कुटुंबाकडे आली आहे.केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये केलेल्या नवीन भूसंपादन कायद्याच्या कलम २४(२) अन्वये हा निकाल दिला गेला. ज्या जमिनी हा कायदा लागू होण्याच्या पाच वर्षांहूनही आधी संपादित केल्या गेल्या आहेत, पण ज्यांचा ताबा सरकारने घेतलेला नाही किंवा ज्याचा मोबदला मूळ जमीनमालकांना दिला गेलेला नाही, अशा जमिनींचे संपादन संपुष्टात आल्याचे मानले जाईल, असे नव्या कायद्याचे हे कलम सांगते.वाकचौरे यांची जमीन नवा कायदा येण्याच्या ३६ वर्षे आधी संपादित केली गेली होती. न्यायालयाने सर्व रेकॉर्ड पाहून असा निष्कर्ष काढला की, या जमिनीचा ताबा सरकारने घेतलेला नाही किंवा त्याची भरपाईही दिलेली नाही. सरकारने जमिनीचा ताबा घेतल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. पण ती केवळ कागदोपत्री नोंद आहे. प्रत्यक्षात इतकी वर्षे ही जमीन वाकचौरे कुटुंबच कसत आहे, असे न्यायालयाने म्हटले. शिवाय वाकचौरे यांना १.२७ लाख रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची भूसंपादन अधिकाऱ्याकडे नोंद असली तरी ही रक्कम प्रत्यक्षात वाकचौरे यांनी घेतलेली नाही किंवा ती न्यायालयातही जमा केलेली नाही. त्यामुळे संपादित जमिनीची भरपाई दिली असे होत नाही, असे न्यायालयाने म्हटले.या सुनावणीत वाकचौरे यांच्यासाठी अ‍ॅड. एस.टी. शेळके यांनी तर राज्य सरकारसाठी साहाय्यक सरकारी वकील एस.एस. धांडे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)