शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठोक पगारी चालक-वाहक भरतीस नकार

By admin | Updated: June 30, 2016 03:19 IST

६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती.

कल्याण : केडीएमटीत दाखल झालेल्या ६० बस चालक-वाहकांअभावी धूळखात पडल्याने प्रशासनातर्फे त्यांची ठोक पगारी तत्त्वावर भरती केली जाणार होती. परंतु, यासंदर्भात केलेला ठराव राज्य सरकारने फेटाळल्याने कंत्राटी प्रक्रिया पद्धतीने चालक-वाहक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत केडीएमटीत १८५ बस येणार आहेत. यातील १० व्होल्वो आणि उर्वरित ६० बस आॅगस्ट २०१५ मध्ये दाखल झाल्या आहेत. १० व्होल्वो या रस्त्यावर धावत आहेत. परंतु, चालक आणि वाहकांच्या कमतरतेमुळे ६० बस वापराविना धूळखात पडल्या आहेत. त्यांचा आलटूनपालटून वापर केला जात आहे. पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष वेधताना परिवहन सदस्यांनीही कर्मचारी भरतीचा विषय सातत्याने लावून धरला होता. या पार्श्वभूमीवर महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन सभापती, सदस्य आणि अधिकारी यांची बैठक झाली होती. त्यात तातडीने ठोक पगारी तत्त्वावर वाहक व चालकभरतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रस्ताव मंजूर केला. नवीन पदनिर्मितीस बंदी सरकार निर्णयानुसार वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी नवीन पदनिर्मितीस बंदी आहे. हा निर्णय राज्यातील सर्व महापालिकांना लागू आहे. त्यानुसार, केडीएमटीतील पदे बाह्य यंत्रणांकडून (आउट सोर्सिंग) भरावीत. त्यासाठी कोणतीही पदनिर्मिती न करता त्यावरील खर्च ‘कार्यालयीन खर्च’ या उद्दिष्टाखाली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नातून भागवावा, असे निर्देश सरकारने दिले आहेत.आजच्या बैठकीकडे लक्ष : मात्र, याबाबत भविष्यात अडचण उद्भवल्यास वाहक आणि चालकांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय सरकारने दिला आहे. त्याआधारे आता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा निर्णय केडीएमटी प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, गुरुवारी होणाऱ्या केडीएमटीच्या बैठकीत बाह्य यंत्रणेकडून प्रस्ताव मागवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. चालकांअभावी सेवा नाही : पुरेशा बस असूनही चालकांअभावी नागरिकांना चांगली सेवा देता येत नसल्याचे वास्तव आहे. उर्वरित ११५ बस निधीअभावी अजूनही केडीएमटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत.