शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या तक्रारींना आळा घालणे आवश्यक!

By admin | Updated: June 30, 2016 04:33 IST

खोटी तक्रार करून तपास यंत्रणा आणि न्यायालयांवरील ताण वाढवण्यात येतो अशा लोकांना कडक संदेश देण्याची वेळ आली आहे

मुंबई : खोटी तक्रार करून तपास यंत्रणा आणि न्यायालयांवरील ताण वाढवण्यात येतो अशा लोकांना कडक संदेश देण्याची वेळ आली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने एका विकासकाविरुद्ध खोटी तक्रार नोंदवणाऱ्या वकिलाची चौकशी करण्याचा आदेश पालघर पोलिसांना दिले. महाराष्ट्र महसूल अधिनियमानुसार, आदिवासींना जागा विकण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. त्यांची जागा विकत घेण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करणे आवश्यक आहे.पालघर जिल्ह्यातील बंड्या तुंबडा यांनी एका विकासकाला त्यांची जमीन विकली. मात्र काही दिवसांनंतर विकासकाविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार, संबंधित विकासकाने तुंबडा यांच्याकडून जबरदस्तीने जागेचा ताबा मिळवला. तसेच विकासकाने तुंबडा यांना घरी बोलावून जातीवाचक शिव्या दिल्या. विकासकानेही तुंबडा यांच्याविरुद्ध पालघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर या दोघांनीही एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. वास्तविक तुंबडा यांनी विकासकाविरुद्ध तक्रार केली नसल्याचे सुनावणीत उघडकीस आले. तुंबडा यांच्यावतीने अ‍ॅड. प्रवर्तक पाठक यांनी खंडपीठाला सांगितले की, तुंबडा यांनी जागेचा व्यवहार करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आर. आर. त्रिपाठी नावाच्या वकिलाच्या कार्यालयात गेले होते. त्या वकिलाने तुंबडा यांच्या अंगठ्याचा ठसा काही कागदपत्रांवर घेतला होता. मात्र ही कागदपत्रे इंग्रजीमध्ये असल्याने तुंबडा या कागदपत्रातील मजकुराविषयी अनभिज्ञ होते. कागदपत्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी तुंबडा यांनी त्रिपाठीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली. ‘हे प्रकरण सामंजस्याने सोडवले जाऊ शकत नाही. खोट्या तक्रारी करून पोलीस यंत्रणा व न्यायालयांना कामाला लावून मग यांच्या मर्जीनुसार तडजोड करणार, हे चालणार नाही. आरोपांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही पालघर पोलिसांना त्रिपाठी वकिलांची चौकशी करण्याचा आदेश देत आहोत. जर अर्जदार (तुंबडा) यांच्या आरोपांत तथ्य आढळले तर पोलिसांनी वकिलावर योग्य ती कारवाई करावी. मात्र आरोपपत्र उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय दाखल करू नये,’ असे म्हणत न्यायालयाने पालघर पोलीस अधीक्षकांना १३ जुलैपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)>मर्जीनुसार तडजोड चालणार नाहीपोलीस यंत्रणा व न्यायालयांना कामाला लावून मग यांच्या मर्जीनुसार तडजोड करणार, हे चालणार नाही. खोट्या तक्रारी करणाऱ्यांना कडक संदेश देण्याची आता वेळ आली आहे. आरोपांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही पालघर पोलिसांना त्रिपाठी वकिलांची चौकशी करण्याचा आदेश देत आहोत. अशा तीव्र शब्दांमध्ये न्यायालयाने आक्षेप नोंदवले.