शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारांच्या १,९०७ जागा भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:13 IST

राज्य पोलीस दलात खात्यांतर्गत फौजदारांच्या १९०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात १९८० ते ९० या काळात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार होण्याची

यवतमाळ : राज्य पोलीस दलात खात्यांतर्गत फौजदारांच्या १९०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात १९८० ते ९० या काळात भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार होण्याची संधी मिळणार आहे. राज्य पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार व्हटकर यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. व्हटकर म्हणाले, की २०१३ ला खात्यांतर्गत फौजदार पदासाठी परीक्षा घेताना १९०७ जागा रिक्त होत्या. त्यावेळी पुढील तीन वर्षांत सेवानिवृत्तीद्वारे रिक्त होणाऱ्या संभाव्य जागांचा त्यात समावेश करण्यात आला होता. या जागांवर परीक्षा उत्तीर्ण होऊन सेवाज्येष्ठतेनुसार पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फौजदार म्हणून नियुक्तीही देण्यात आली होती. परंतु नंतर न्यायालयाने त्यावर स्थगनादेश दिला. त्यामुळे पुढे या कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात (अ‍ॅडहॉक) नियुक्त्या देण्यात आल्या. त्याच कर्मचाऱ्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने स्थगनादेश उठविल्याने स्थायी स्वरूपात फौजदार म्हणून नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. १९८० नंतर पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना या जागांवर संधी मिळू शकते, असेही व्हटकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल फौजदार पदासाठी खात्यांतर्गत परीक्षेद्वारे पात्र ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्त्या द्याव्यात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर रोजी दिले आहेत. शिवाय ‘मॅट’चा ‘सहायक फौजदारच पात्र’ हा आदेश रद्द ठरविला आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला ‘मॅट’मधील मूळ याचिकाकर्त्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने सर्वोच्च न्यायालयात आधीच ‘कॅव्हेट’ दाखल करून ठेवला आहे.