शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पुरावे सादर करण्यात अपयश

By admin | Updated: March 18, 2016 02:42 IST

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलीच चपराक लगावली. २४० पानी निकालात उच्च न्यायालयाने हिमायत बेगवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी

मुंबई: जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला चांगलीच चपराक लगावली. २४० पानी निकालात उच्च न्यायालयाने हिमायत बेगवरील आरोप सिद्ध करण्यास सरकारी वकील अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला आहे.बेगला सर्व आरोपांतून मुक्त करताना केलेली कारणमिमांसा पुढीलप्रमाणे१) हिमायत बेगच्या मालकीच्या ‘ग्लोबल इंटरनेट कॅफे’ मध्ये बॉम्ब बनवण्यात किंवा जमवण्यात आले, हे सिद्ध करण्यास सरकार अपयशी ठरले. कॅफेमधल्या कर्मचाऱ्यांना कॅफे सोडण्यास सांगितले याचा अर्थ आरोपीने बॉम्ब बनवला, असा होत नाही. बॉम्ब कोणी, का आणि बॉम्बस्फोट करणाऱ्यांपर्यंत तो कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित राहतात. या अनुत्तरित प्रश्नांमुळे हा स्फोट आरोपीनेच केला, असा निष्कर्ष काढू शकत नाही, ते पटवून देण्यास सरकारी वकील असमर्थ ठरले.२)बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. मात्र सरकारी वकिलांनी रेकॉर्डवर आणलेल्या पुराव्यांवरून त्याच्यावर ठेवलेले हे आरोपी सिद्ध होत नाहीत. पुराव्यांची साखळी पूर्ण नाही. त्यामुळे हे कृत्य आरोपीनेच केले, असे ठरवणे शक्य नाही. ‘कदाचित’ आणि ‘केलेच’ या दोन शब्दांमध्ये मोठा फरक आहे. ‘कदाचित’पासून ‘केले’या शब्दाचे अंतर कापण्यामध्ये सरकारी वकील अपयशी ठरले आहेत. ३)आरोपीच्या घरातून आरडीएक्स जप्त केले, हे सरकारी वकिलांनी सिद्ध केले आहे. मात्र आरडीएक्स सापडल्याने आरोपी पुढील कटात सहभागी होता आणि त्याने बॉम्ब ठेवणाऱ्याला (यासिन भटकळ) बॉम्ब दिल्याचे सिद्ध होते का? हे प्रश्न उपस्थित होतात. यासंदर्भात कोणतेच पुरावे नाहीत. सरकारी वकील परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारीत असताना ते आधारीत असलेल्या प्रत्येक परिस्थितीसाठी पुरावे मागणे योग्य नाही. केवळ शक्यतांच्या आधारे निष्कर्ष काढून आरोप सिद्ध केला जाऊ शकत नाही. जेवढा मोठा गुन्हा त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचे पुरावे असले पाहिजेत. (प्रतिनिधी) आरोपीने बाळगलेली स्फोटके आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात वापरलेली स्फोटके यांचा संबंध असेल. मात्र हा संबंध योग्य त्या पुराव्यांद्वारे सिद्ध केला पाहिजे, जेणेकरून न्यायालय त्यावर विश्वास ठेवू शकेल. या केसमध्ये त्या पुराव्यांचाच अभाव आहे.दाखवण्यात आलेल्या क्लीपिंग आणि दिनेश कदम या तपास अधिकाऱ्याच्या साक्षीमुळेच बॉम्ब ठेवणारा यासिन भटकळ असल्याचे ओळखता आले. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. आरोपीला शेवटचे यासिन भटकळबरोबर जाताना पाहिले अािण तशी साक्ष एका रिक्षा ड्रायव्हरने दिली, सरकारी वकील याच साक्षीवर आधारित आहेत.आरोपीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याची जिहादी वृत्ती, दोन सेल फोन, सिम मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे इत्यादी बाबींमुळे आरोपी बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचे सिद्ध होत नाही.