शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला

By admin | Updated: December 25, 2015 23:43 IST

राजन तेलींचा घरचा आहेर : मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

सावंतवाडी : जिल्हा प्रशासन सध्या जनतेला ओरबाडण्याचे काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. यामध्ये योग्यवेळी प्रशासनाने बदल करावा, अन्यथा आम्हाला कडक पावले उचलावी लागतील, असा घरचा आहेर माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रितसर तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद नेवगी, मनोज नाईक, आदी उपस्थित होते.माजी आमदार राजन तेली म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये प्रशासनावर कोणाचाही वचक राहिला नाही त्यामुळे प्रशासनाची मनमानी सुरू आहे. ही मनमानी जनतेला वेठीस धरणारी असून, जिल्ह्यातील अधिकारी डंपर व्यावसायिकांकडून तसेच वाळू, खडी, आदी व्यवसायांना नियमांच्या बाहेर जाऊन दंड आकारतात. यामुळे प्रसंगी डंपर मालक व चालक आत्महत्या करतील. मग याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न तेली यांनी उपस्थित केला.प्रशासन कशाप्रकारे दंड आकारते, याचे प्रत्येक तालुक्यातील पुरावे आम्ही गोळा केले आहेत. सोमवारी याबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याशी चर्चा करणार असून, त्यानंतर प्रशासनाच्या वागणुकीत फरक पडला नाही, तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे तेली यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे; पण अधिकाऱ्यांनी मार्चपूर्वी पैसे खर्च करायला पाहिजेत. जर ते खर्च केले नाहीत, तर पैसे परत जातील, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)राणेंनी मागेवळून पाहावेराजन तेली यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ज्यांना सत्तेत राहूनही कोणताच विकासाचा प्रकल्प पूर्ण करता आला नाही, त्यांनी आम्हाला विकासाचे धडे देऊ नयेत. उलट भाजप-शिवसेनेच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी येत असून, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. शंभर कोटींचा निधी पर्यटनासाठी केंद्र सरकारने दिला असून, जिल्हा नियोजनाचा निधीही आता १२५ कोटींच्या वर गेला आहे. नारायण राणे यांनी शासनावर टीका करणे योग्य नाही. सी-वर्ल्ड तसेच चिपी विमानतळ, आदी प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण का झाले नाहीत? असा सवालही तेली यांनी उपस्थित करीत टीका करण्यापेक्षा राणेंनी मागे वळून पाहावे, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.