शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यक्रमांपासून जानकरांची फारकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 03:48 IST

अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे.

गौरीशंकर घाळे,

मुंबई- अहल्याबाई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त आयोजित सरकारी सोहळ्यापासून राष्ट्रीय समाज पक्षाने फारकत घेतली आहे. अहल्याबार्इंचे जन्मस्थान चौंडी येथे ३१ मे रोजी भव्य कार्यक्रमासाठी भाजपा सरकार गुंतले असताना मित्रपक्ष रासपने मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे देशातील सर्वात मोठा जन्मोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी जानकरांच्या रासपने चालविली आहे. याच कार्यक्रमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करण्याची घोषणा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर अभ्यासासाठी वेळ मागितला होता. अशाप्रकारच्या अभ्यासासाठी दीड-दोन वर्षांचा काळ पुरेसा असतो. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रासपने स्पष्ट केले आहे. अलीकडच्या काळात धनगर आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकांस महादेव जानकर अनुपस्थित होते. अलीकडेच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी यशवंतराव प्रतिष्ठान येथे बैठक घेतली. यास विविध पक्षांतील धनगर आमदार आणि नेते उपस्थित होते. या बैठकीस महादेव जानकर हजर नव्हते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक झाली. यात शास्त्रीय संशोधन पद्धतीने पारदर्शक अहवाल तयार करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या बैठकीसही जानकर अनुपस्थित होते. आझाद मैदान येथील सोहळ्यास कर्नाटक, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आसाम, प.बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली आदी. राज्यातून प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे असणार आहेत. याशिवाय शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते, रिपाइंचे खा. रामदास आठवले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी, आ. विनायक मेटे आदी नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. >राज्यातील सत्तेत वाटा मिळावा, ही छोट्या घटकपक्षांची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. गेली दीड वर्षे धनगर आरक्षण आणि मंत्रिपदाचे फक्त आश्वासन मिळत असल्याने रासपमध्ये नाराजी आहे. महादेव जानकर यांनी तर थेट पत्रकार परिषदेतच आपली नाराजी बोलून दाखविली होती.आमदारकी मिळाल्यानंतर महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्याला बगल दिल्याचीही टीका झाली. त्यामुळे आझाद मैदान येथील कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा लढा तीव्र केला जाणार आहे.