शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मेळघाटात आजपासून ‘फागून’ उत्सव

By admin | Updated: March 5, 2015 02:00 IST

मेळघाटातील कोरकू या आदिवासी जमातीत होळीला दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व आहे. पाच दिवसांच्या ‘फागून’ (होळी) उत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात होणार आहे.

नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरामेळघाटातील कोरकू या आदिवासी जमातीत होळीला दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व आहे. पाच दिवसांच्या ‘फागून’ (होळी) उत्सवाला आज गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. संपूर्ण आठवडा रंगांची बरसात अन् ढोल- बासरीच्या गजराने निनादून जाईल. उत्सवात आदिवासींचे पारंपरिक नृत्यावर थिरकणारे पाय व जांगडीकडून फगवा मागण्याची पद्धत ‘जरा हटके’च आहे.देशभरात कोरकू जमात फक्त येथेच वास्तव्यास आहे. ‘फागून’ जवळ येऊ लागला की कोरकूंची लगबग सुरू होते. कुटुंबातील सर्वच सदस्य नवीन वस्त्र खरेदी करतात. आदिवासी समाजात दोन दिवस होळी पेटविण्याची परंपरा आहे. पहिल्या दिवशी घराघरापुढे होळी पेटविली जाते. तर दुसऱ्या दिवशी गावशिवारावर मोठी होळी पेटविण्याची प्रथा आहे. होळीसाठी नदीपात्रातूनच पाच दगड आणले जातात. घरापुढे जांभुळाच्या पानांचा मंडप उभारूण खोदलेल्या खड्ड्यात एकएक दगड टाकला जातो. या पाच दगडांना रावण संबोधून पूजन केले जाते.च्शनिवारपासून आठवडाभर ‘फगवा’ मागण्यासाठी आदिवासी युवक-युवतींचे जत्थे रस्त्यावर दिसतील. जांगडी (शहरी माणूस)कडून फगवा मागण्याची आदिवासींची पुरातन पद्धत आहे. च्गावरस्त्यांसह मुख्य रस्ते व बाजारपेठेत आदिवासी ढोल-बासरीच्या तालावर कोरकू भाषेतील गितांच्या तालावर नृत्य सादर करतात. ये-जा करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्याकडून ‘फगवा’ मागतात.च्पाचव्या दिवशी सर्व रक्कम एकत्र करून गावशिवारात सामूहिक जेवणावळी उठतात. बकरा, जिलू (मटण), चावली (भात) पुरी व सिड्डू (मोहाची दारू) अशी ही पंगत असते.४३ कोटींचे वाटपमहात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील पंधरा हजारांपेक्षा अधिक मजुरांना एका महिन्यात ४३ कोटी रुपयांचे वेतन पोस्टाद्वारे देण्यात आले. होेळीपूर्वी आदिवासींना वेतन मिळावे, याकरिता प्रशासनाने आधीच तयारी केल्याचे तहसीलदार आर.यू. सराडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्यातली होळी, देई राजस्थानात पोळीअरुण बोत्रे ल्ल सांगोला‘अरे भाई ढोलक बनाना हमारा खानदानी पेशा हंै, हिंदुस्थान के हर राज्य मे किसी ना किसी गाव में जयपूरवालों के ढोलक की आवाज गूंजती हैं’ पन्नाशी गाठलेला जयपूरचा मोहम्मद सोहेल मोठ्या उत्साहाने सांगत होता. पंधरवड्यापासून सोहेल त्याच्या १५-२० सहकाऱ्यांसह सांगोल्यातीलगावागावात ढोलकी आणि हलग्या विकत फिरत आहे. त्यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसादही मिळत आहे. निमित्त आहे होळी सणाचे. गावागावात होळी पेटवून बोंब मारत हलगी आणि ढोलकीचा निनाद करण्याची परंपरा आहे. त्यासाठी अनेक जण हलगी आणि ढोलकी खरेदी करतात. त्यामुळे राज्यातील होळी राजस्थानातून आलेल्या सोहेलसारख्या अनेक जणांना हक्काची पोळी देत आहे. एखाद्या गावातील तंबू टाकून दोन-तीन दिवस मुक्काम करायचा. गावभर हलगी व ढोलकी वाजवून दवंडी पिटायची आणि लोकांची आॅर्डर घेऊन त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे ढोलकी व हलगी तयार करून द्यायची आणि पुन्हा दुसऱ्या गावाला जायचे, असा या मंडळींचा दिनक्रम आहे.