शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांना हवी युती, गडकरींना राष्ट्रवादी?

By admin | Updated: November 12, 2014 02:05 IST

शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही.

मुंबई : शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. शिवसेनेशिवाय देखील राज्यात भाजपाची सत्ता टिकेल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आहे.
सेनेला सोबत घेण्याच्या इच्छेत फडणवीसांसोबत पंकजा मुंडे, विनोद तावडे देखील आहेत. मात्र एकनाथ खडसे यांनी ‘शतप्रतिशत भाजपा’चा नारा दिल्याने राज्य भाजपात यावरून मतभिन्नता आहे. सेना सोबत आली तर गडकरींचे महत्त्व कमी होईल आणि फडणवीस यांचे नवे नेतृत्व जोमाने कामाला लागेल, असा हेतू फडणवीस गटाचा आहे. मात्र दिल्लीत राहूनही राज्यावर नियंत्रण ठेवण्याची चालून आलेली संधी गडकरी गट सोडायला तयार नाही.
युती केली नाही तरीही 11क् जागांर्पयत भाजपा जाऊ शकते, असा सव्रेक्षणाचा निष्कर्ष निवडणुकीआधी पक्षाच्या हाती आला होता. त्या वेळी बाकीच्या 4क् जागा आणून देण्याची जबाबदारी आपली असेल, तुम्ही युती तोडा, असे गडकरींनी सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, युती होऊ शकत नाही, असे सांगण्याच्या सूचना अमित शहा यांनी त्या वेळी फडणवीस यांना केल्या होत्या. मात्र अखेर्पयत ही घोषणा प्रदेशाध्यक्ष असूनही फडणवीस यांनी केली नाही. तीखडसे यांच्या तोंडून केली गेली. गडकरी आणि राष्ट्रवादीचे सव्रेसर्वा शरद पवार यांचे संबंध कायम चांगले राहिलेले आहेत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गडकरी यांच्या संबंधात कायम खटास आलेली आहे. मनसेला सोबत घेण्याची तयारी गडकरींनी चालवलेली होती, पण मनसेच्या अपयशामुळे ती शक्यता संपुष्टात आली.
राज्यात सत्तेची मोट बांधण्यात व अडचणीच्या काळात सत्ता तारून नेण्यात गडकरींची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि फडणवीस यांचे महत्त्व त्यातून कमी होईल, ही देखील बाजू या सगळ्या नाटय़ामागे आहे. तर बहुमताचे सरकार असले की चांगले काम करून दाखवता येईल आणि स्वत:ची वेगळी छाप पाडता येईल, असे फडणवीस यांना वाटत आहे. (प्रतिनिधी)
 
राज्यात सत्तेची मोट बांधण्यात व अडचणीच्या काळात सत्ता तारून नेण्यात गडकरींची भूमिका महत्त्वाची ठरेल आणि फडणवीस यांचे महत्त्व त्यातून कमी होईल, ही देखील बाजू या सगळ्या नाटय़ामागे आहे.