शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांची आज जिल्ह्यात दहावी वारी

By admin | Updated: February 21, 2016 02:45 IST

नाट्यसंमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उपस्थित राहणार असून राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून त्यांची जिल्ह्यातील ती दहावी वारी असेल.

- पंकज रोडेकर,  ठाणे नाट्यसंमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी उपस्थित राहणार असून राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यापासून त्यांची जिल्ह्यातील ती दहावी वारी असेल. वर्षभरात वरचेवर ठाण्याला भेटी देणारे फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील वर्षाच्या प्रारंभी ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुका असल्याने फडणवीस वरचेवर पायधूळ झाडत असल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे.आगामी महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून शिवसेनेने ९६ व्या अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाच्या दिमाखदार आयोजनात पुढाकार घेतला. सांस्कृतिक क्षेत्रातील या पुढाकाराचा शिवसेनेला नेहमीच लाभ होत राहिला असताना संमेलनाच्या समारोपाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट व अन्य मंडळींकरिता कोणत्या घोषणा करणार, याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्या तर त्याचा लाभ भाजपाला होईल. जिल्ह्यात भाजपाला उभारणी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूत्रे हाती घेतल्याचे बोलले जाते. त्यांनी जिल्ह्यात एकूण नऊ कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. यामध्ये ठाण्याला ५, कल्याण २, भिवंडी व नवी मुंबईत प्रत्येकी एक कार्यक्रम आहे. नाट्यसंमेलनाच्या समारोपाला दहाव्या वेळी ते उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाला शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बोलवून शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले, तर आता समारोपाला फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे भाजपाला शक्तिप्रदर्शनाची संधी लाभली आहे.