शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारकडूनही घोर निराशाच!

By admin | Updated: July 6, 2015 02:08 IST

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ९३५ शिक्षकांच्या पायाभूत वाढीव पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी, या शिक्षकांच्या वेतनाला अद्यापपर्यंत मंजुरी दिलेली नाही.

अकोला : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ९३५ शिक्षकांच्या पायाभूत वाढीव पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी, या शिक्षकांच्या वेतनाला अद्यापपर्यंत मंजुरी दिलेली नाही. वेतनाअभावी या शिक्षकांचे हाल होत असून, आघाडी सरकारनंतर भाजपा-शिवसेना सरकारकडूनही त्यांच्या पदरी घोर निराशाच आली आहे.राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील १२१५ पदांपैकी ९३५ पदांना राज्य शासनाने गतवर्षी विधिमंडळ अधिवेशनात मान्यता दिली; परंतु त्यांच्या वेतनाची तरतूद मात्र शासनाने केली नाही. या मुद्द्यावर संबंधित शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलने केली, धरणे दिले. याबाबतचा मुद्दा शिक्षक आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनामध्ये उचलूनही धरला. त्या वेळी शिक्षकांसाठी वेतनाची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले़ परंतु नंतर ते आश्वासन हवेत विरले. वेतनाच्या तरतुदीसाठी शासनाने कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची यादी मागविली; परंतु महाविद्यालयांकडून यादी आली की, त्यात काही ना काही त्रुटी काढून यादी परत पाठविली जाते, असा आरोप शिक्षकांनी केला आहे़ शासनाच्या या भूमिकेमुळे वेतनाशिवाय काम करणाऱ्या शिक्षकांचे हाल होत आहेत. निवडणुकीआधी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला आता मात्र आश्वासनांचा सोयीस्कररीत्या विसर पडत आहे, असा आरोप पायाभूत शिक्षकांचे प्रतिनिधी प्रा. हनुमान लोहार यांनी केला आहे.राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन ९३५ शिक्षकांच्या पदांना मान्यता दिली असली तरी त्यामधील जे शिक्षक पात्रतेचे निकष पूर्ण करीत असतील त्यांच्या वेतनाला वित्त विभागाकडून मान्यता दिली जाईल. पात्र शिक्षकांची खातरजमा करण्याचे काम संबंधित महाविद्यालये व शिक्षण उपसंचालक करीत आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.- विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र