शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस, गडकरींच्या नेतृत्वाला पावती

By admin | Updated: February 26, 2017 01:29 IST

संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री

- कमलेश वानखेडे,  नागपूरसंघ मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपाने हॅटट्रीक मारली. अमरावतीतही भाजपने काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्त्वाला नागपूरसह अमरावतीकरांनीही पावती दिली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचे पुरते पानीपत झाले. शिवसेनेने ताणलेला बाण तुटला, राष्ट्रवादीच्या घड्याळाचेही बारा वाजले. नागपुरात गेल्या दशकापासून महापालिकेत असलेली सत्ता कायम राखण्यात भाजपला यश आले. भाजपचे ६१ नगरसेवक होते. एकतर्फी मुसंडी मारत त्यांनी १०८ जागा जिंकल्या. ‘मिशन १२५’ चा नारा देत भाजपा रिंगणात उतरली होती. गडकरी, फडणवीसांचे शहर असल्यामुळे प्रतिष्ठा पणाला होती. याची जाणीव ठेवत भाजपाने रणनिती आखली.वास्तविकता स्वीकारून घेतलेल्या कटू निर्णयांचा भाजपाला फायदाच झाला. संघ परिवारातून झालेल्या बंडखोरीमुळे काहीच नुकसान झाले नाही. तर, दलित बहुल उत्तर नागपुरात तर दोन नगरसेवकांची भाजपा तब्बल १० वर पोहचली. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात होता. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार- शहर अध्यक्ष विकास ठाकरे तसेच माजी मंत्री नितीन राऊत - सतीश चतुर्वेदी अशा दोन गटात काँग्रेसली विभागली गेली होती. अशातच प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर हसनबागेतील सभेत शाई फेकण्यात आली. या प्रकारामुळे काँग्रेसला साथ देण्याच्या मनस्थितीत असलेला मतदार गटबाजी पाहून थबकला. गेल्यावेळी ४१ वर असलेली काँग्रेस २९ पर्यंत खाली घसरली.राष्ट्रवादीचे संख्याबळ सहा वरुन एकवर आले. पक्षाला ताकद देण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या हाती शहर अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. मात्र, घडाळ्याची टीक टीक सुरू ठेवण्यात देशमुखांना यश आले नाही. राष्ट्रवादीने मुस्लिम लीग, पीरिपा आदी पक्षांना एकत्र करीत महायुती उभारली. सव्वाशेवर उमेदवारही रिंगणात उतरविले. मात्र, या महायुतीचा कुठलाही फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. शिवसेनामुक्त नागपूर होता होता राहिले. गेल्यावेळी ६ नगरसेवकांची असलेली शिवसेना यावेळी ‘टू व्हिलर’ पार्टी झाली. फक्त दोनच नगरसेवक वियजी झाले. निवडणुकीत शिवसेनेचा ‘आवाज’ कुठे गेला हे कळलेच नाही. खा. संजय राऊत यांनी एक दिवसाची भेट वगळता एकही मोठा नेता, मंत्री नागपुरात फिरकला नाही. शिवसैनिकांनी मुंबईहून रसद पुरविली गेली नाही. भाजप- काँग्रेसने नाकारलेले बंडखोर शिवसेनेने गोळा केले. पण त्यांच्या तोफांमध्ये बारुदच नव्हती. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची कार्यकारिणीच अस्तित्वात नव्हती. विना पदाचे कार्यकर्ते कितपत लढा देणार, यावर नेत्यांनी कधीच गांभीर्याने विचार केला नाही. शिवसेनेने दोन वर्षात तीन संपर्कप्रमुख बदलले पण एकही संपर्कप्रमुख शिवसैनिकांच्या संपर्कात राहिला नाही. सुरुवातीला संपर्कप्रमुख असलेले डॉ. दीपक सावंत मंत्री झाल्यानंतर मंत्रालयात रमले. त्यांच्या जागी आलेले आ. अनिल परबही दोन-तीन भेटीनंतर मुंबई महापालिकेच्या तयारीत व्यस्त झाले. निवडणुकीच्या तोंडावर मिळालेले आ. तानाजी सावंत प्रत्यक्ष निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात नागपूर मुक्कामी नव्हते. त्यामुळे नागपुरात सरदाराविना लढत असलेल्या सेनेचा पराभव निश्चित होता. अमरावतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून भाजपाने रोवला झेंडाअमरावती महापालिकेतही भाजपाने परिवर्तन घडविले. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथून फेकली. ८७पैकी तब्बल ४५ जागा जिंकत भाजपाने एकतर्फी विजय नोंदविला. अमरावतीत भाजपाच्या वतीने पालकमंत्री प्रवीण पोटे व आ. सुनील देशमुख यांनी किल्ला लढविला व लढाई जिंकली. पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसने स्वत:चे वाटोळे करून घेतले.काँग्रेसला फक्त १५ जागा मिळाल्या. गेल्या वेळच्या तुलनेत १० जागांचा फटका बसला. अमरावतीत एमआयएमने चमत्कार घडविला. तब्बल १० जागा जिंकत तिसरा मोठा पक्ष होण्याचा मान एमआयएमला मिळाला आहे. एमआयएमने इतरही जागांवर घेतलेली मते ही काँग्रेस- राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा आहे. शिवसेना ११ जागांवरून ७वर आली.राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. गेल्या वेळी आलेल्या सर्वच्या सर्व १७ जागा राष्ट्रवादीने गमावल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला तीन जागा मिळाल्या. बसपाला आपल्या ६ जागा कायम राखण्यात यश आले.