शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस यांना कशाची भीती वाटत आहे ?

By admin | Updated: May 30, 2016 04:28 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसली भीती वाटत आहे, असा सूचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला.

ठाणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर राजकीय कारकीर्द संपवेन, अशी धमकी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कसली भीती वाटत आहे, असा सूचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला. मुख्यमंत्र्यांची भाषा सुधारली असून त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारार्थ सभेत नगरसेवकांना पवार यांनी मार्गदर्शन केले.पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीला हितेंद्र ठाकूर यांची मदत मिळाल्याने डावखरे यांचा विजय निश्चित आहे.यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक देशाला, राज्याला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आसाममध्ये सत्ता आल्यामुळे जणू देश ताब्यात आला असून सर्वत्र आबादीआबाद असल्याचे भासवत देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा पंतप्रधान करीत आहेत. पण, या देशाला गांधी, नेहरूंची विचारधारा आहे. ते विचार संपवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीच संपून जाल.डावखरे हे अगदी चार-सहा मतांनी का होईना नेहमी विजयी होतात. त्यामुळे त्यांचे आडनाव बदलून डावखरेऐवजी ‘उजवे’ ठेवायला हवे, अशी टिप्पणी पवार यांनी केली. सर्व नगरसेवकांना शिवसेना-भाजपाने गोव्यात नेले. तेथून कणकवली किती जवळ आहे, हे त्यांना माहिती नाही का, असे उद्गार पवार यांनी नारायण राणे यांच्याकडे पाहून काढताच हशा पिकला. समविचारी पक्षाचे नेते एकत्र आल्यामुळे डावखरे यांचा विजय निश्चित आहे. राज्यात भीषण दुष्काळ असताना व शेतकरी आत्महत्या करीत असताना भाजपा सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन करण्यात दंग आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)>देशात अच्छे दिन आलेच नाहीतदेशात अच्छे दिन आले नाहीत, हे या सरकारला विधान परिषद निवडणूक निकालाने दाखवून देऊ, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. वेगवेगळ्या पक्षांत मैत्रीचे संबंध ही डावखरे यांची जमेची बाजू असल्याचे राणे म्हणाले.बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्याबाबत सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर उलटसुलट मेसेज फिरत आहेत. मात्र, आमचा पाठिंबा केवळ डावखरे यांना असून त्यांना देऊ केलेल्या मतांची संख्या १३५ वरून १५० कशी होईल, याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर म्हणाले.