शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापसाचे करावे लागणार फेरनियोजन!

By admin | Updated: July 13, 2015 01:21 IST

१५ जुलैपर्यंंत पावसाची प्रतीक्षा

अकोला: जुलै महिना उजाडला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मूग, उडीद पिकाची सलग पेरणी आता शक्य नसल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फेरपेरणीचे आपत्कालीन नियोजन केले आहे. १५ जुलैपर्यंंत पाऊस आलाच नाही तर मात्र कपाशी पेरणीचेदेखील फेरनियोजन करावे लागणार आहे. खरीप हंगामात विदर्भात सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भात आदी पिकांची शेतकर्‍यांनी जूनमध्ये पेरणी केली; परंतु पावसाने दडी मारली आहे. यामुळे कृषी विद्यापीठाने जुलै महिन्याचे पिकांचे नियोजन केले आहे. मूग, उडीद, ज्वारी या पिकांची पेरणी याच आठवड्यात होणे आवश्यक होते. तथापि पाऊस नसल्यामुळे मूग, उडीद सलग पेरणी आता शक्य नसल्याने एवढय़ात पाऊस आला तरच आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल. त्यासाठी मात्र २0 टक्के बियाणे अधिक वापरावे लागणार आहे. कापूस पेरणी करण्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीन कपाशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी लवकर परिपक्व होणारे अमेरिकन अथवा देशी कापूस यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर वरील आंतरपिके घ्यावीत. तसेच काही क्षेत्रावर कापूस: ज्वारी: तूर: ज्वारी (६:१:१:१) किंवा (३:१:१) त्रिस्तरीय कापूस अधिक तूर आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. सलग सोयाबीन पिकासाठी शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन अधिक तूर आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्‍यांना फायदा होतो. सलग ज्वारी पिकासाठी शिफारशीसह ज्वारी अधिक तूर (३:३) आंतरपीक पद्धतीमुळे फायदा होतो. २0 ते २५ टक्के बियाणे अधिक वापरावे. तूर शिफारशीप्रमाणे लागवड करावी, कापूस अधिक तूर (६:२) किंवा सोयाबीन अधिक तूर (४:२/६:२) आंतरपीक घ्यावे. मूग, उडीद पिके ही उथळ काळ्य़ा जमिनीत लावावे, मका शिफारशीप्रमाणे लागवड करावा.