शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभूंकडून उद्या होणार सुविधांचा वर्षाव

By admin | Updated: August 21, 2016 20:44 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सोयिसुविधांचा वर्षाव करण्यात येणार आहे.

ऑनलाइन लोकमत,

मुंबई, दि. 21 - मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांचा वर्षाव करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रसाधनगृह, लिफ्ट, पादचारी पूल यांचे उद्घाटन केले जाईल. महत्वाची बाब म्हणजे आठ स्थानकांवर वायफाय सेवेचेही उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पायाभूत सोयिसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. यात सरकते जिन्यांबरोबरच प्रसाधनगृह, सरकत्या जिन्यांसह अन्य सुविधांचा समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईत येऊन त्यांच्या उद्घाटनांचा धडाकाच लावला आहे. सोमवारीही रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते जवळपास १४ सुविधांचे उद्घाटन दादर येथील एका कार्यक्रमात करतानाच आठ सुविधांचे लोकार्पण करण्यात येईल. यात महत्वाच्या अशा वायफाय सुविधेचा समावेश असून कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे), दादर (पश्चिम), वान्द्रे टर्मिनस, चर्चगेट,वान्द्रे (लोकल), खार रोड स्थानकात ही सुविधा सुरु केली जाईल. त्याचप्रमाणे दादर येथे गार्डन, सीएसटी येथे एसी विश्रामगृह, वॉटर रिसायकलिंग प्लान्ट आणि अपंग व्यक्तींसाठी बायो टॉयलेटही सुरु केले जात असून त्याचेही उद्घाटन होईल. सध्या काही स्थानकांवर टॉयलेटची कमतरता असून अशा स्थानकांवर नवे टॉयलेटही बनविण्यात आले आहे. कुर्ला व ठाणे येथे डिलक्स टॉयलेट, महालक्ष्मी येथे पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट, खार रोड स्थानकात नम्मा टॉयलेट आणि कल्याण, गोवंडी स्थानकातही नव्या टॉयलेटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. - नालासोपारा व गोरेगाव येथे तिकीट खिडक्यांबरोबरच बोरिवली येथे जी प्लस टू इमारत आणि नवीन तिकीट खिडक्याही सुरु केल्या जात आहे.

लोकार्पण करण्यात येणारे प्रकल्प-हार्बरवर बारा डबा प्रकल्प- हार्बरवर दोन नविन बारा डबाचे प्लॅटफॉर्म- अंधेरी येथे दोन लिफ्ट- गोरेगाव स्थानकात बुकींग आॅफीस- कर्जत, शहाड, कुर्ला, किंग्ज सर्कल, रे रोड, चेंबूर येथे पादचारी पुल- वसई रोड आणि नालासोपारा येथे पादचारी पुल व सरकते जिने.