शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बँकांसमोरील रांगांकमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांकरीता सुविधा केंद्र

By admin | Updated: November 16, 2016 17:55 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. १६  : पैशांसाठी बँकांसमोरील रांगांमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी ...

ऑनलाइन लोकमतअकोला, दि. १६  : पैशांसाठी बँकांसमोरील रांगांमध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयांमध्ये सुविधा केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. या सुविधा केंद्रांद्वारे पतसंस्थांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतील या केंद्राला बुधवारी प्रारंभ झाला.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. हा निर्णय जाहीर करतानाच चलनी नोटा बदलून घेणे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजनादेखील करण्यात आल्या आहेत; परंतु कोणत्याही चांगल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही अडचणी येतातच. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना येणाऱ्या काही अडचणींची दखल घेऊन जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये १५ दिवसांसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनंदिन लागणाऱ्या वस्तू, साहित्य व औषधी व इतर जीवनावश्यक वस्तू संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थांकडून खरेदी करून उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक कार्यालयात ह्यसुविधा केंद्रह्ण स्थापन करण्याचे परिपत्रक काढण्यात आले असून, विविध विभाग प्रमुखांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

सुविधा केंद्रांद्वारे पतसंस्थांमार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ह्यना नफा ना तोटाह्ण या तत्त्वावर जीवनाश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंचे देयक संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून धनादेशाद्वारे कपात करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित विभाग प्रमुखांकडून तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे पैशांसाठी बँका व एटीएमसमोर लागणाऱ्या रांगांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी कमी होणार आहे.

https://www.dailymotion.com/video/x844i4v