शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

सोयी बनल्या समस्या

By admin | Updated: November 11, 2014 00:57 IST

नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही.

अर्धवट सिमेंट रस्ते धोकादायक : मनपाची कंत्राटदारावर मेहेरनजरराजीव सिंह- नागपूर नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही. सध्या अर्धवट सिमेंटचे हे रस्ते वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात सध्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केडीके कॉलेज ते घाट रोड मार्गावर सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी या सिमेंट रस्त्याला १०० ते १५० वर्षांपर्यंत काहीच होणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली. परंतु सध्याच्या स्थितीत अर्धवट झालेला रस्ता अनेक ठिकाणी खचत चाललेला आहे. २०११-१२ मध्ये ३० किलोमीटर रुंदीच्या या सिमेंट रस्त्याच्या खर्चासाठी मनपाने १०० कोटीची तरतूद केली. सुरुवातीला काम गतीने झाले. केडीके कॉलेज ते जगनाडे चौकापर्यंत काम पूर्ण झाले. मात्र, नंदनवन ते रेशीमबाग चौकच्या दरम्यान रस्त्याचे काम बंद पडले. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती आहे. रेशीमबाग मैदानाच्या रस्त्यावर सिमेंट रोड तयार करणारी मशीन जागेवरच उभी असल्याचे आजही दिसून येते. अर्धवट रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून पावसाचे पाणी घरात शिरत आहे. एकीकडे अर्धवट रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले असताना दुसरीकडे मनपाची संबंधित कंत्राटदारावर मेहेरनजर कायम आहे. १०० कोटी नव्हे, आता १३० कोटी सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ही योजना १०० कोटी रुपयांची होती. आता कंत्राटदार महागाई वाढल्याचे सांगत काम पूर्ण करण्यासाठी १३० कोटी रुपयांची मागणी करीत आहे. नियमानुसार दिलेल्या मुदतीत काम न झाल्यामुळे कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला. परंतु दीड वर्षांपासून आर्बिट्रेटरची नियुक्ती करून सुनावणी सुरूच आहे. मनपा आता ११२ कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले, सिमेंट रस्त्याला घेऊन लवकरच बैठक बोलविण्यात येईल. यात सर्व समस्यांचा निपटारा करून कामाला सुरुवात केली जाईल.