शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकचे बनावट खाते चालवणारा अटकेत

By admin | Updated: May 23, 2017 02:06 IST

वर्गमैत्रिणीच्या नावाचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वर्गमैत्रिणीच्या नावाचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या नावाचा व फोटोचा परस्पर वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने तक्रार दिली होती. यानुसार जुईनगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे.प्रणव ढवळे (१८) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. जो ज्या महाविद्यालयात शिकतो, त्याच महाविद्यालयातल्या एका मुलीच्या नावाचे त्याने बनावट फेसबुक खाते उघडले होते. याद्वारे त्याने अनेकांना फ्रेन्ड्स लिस्टमध्ये समाविष्ट करून घेतले होते. याकरिता त्याने त्या मुलीच्या परस्पर तिचे फोटो फेसबुकवर वापरले होते. काही दिवसांपासून तो त्या मुलीच्या फोटोसोबत अश्लील मेसेज शेअर करत होता. यामुळे सदर मुलगीच फेसबुकवर अश्लील वर्तन करत आहे, असा गैरसमज अनेकांमध्ये निर्माण झाला होता. त्यापैकी काहींनी सदर मुलीकडे खात्री केली असता, ते फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार सदर तरुणीने आपल्या नावाचा व फोटोचा गैरवापर होत असल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगुजी औटी यांनी तपासाला सुरवात केली होती. यावेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून छडा लावला.