शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंडने फसवले, सेक्स क्लिपींगने करत होता ब्लॅकमेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 10:54 IST

फेसबुक फ्रेण्डवर विश्वास करून त्याला सर्वस्व सोपविणे एका तरुणीला मोठे महागात पडले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 5 - फेसबुक फ्रेण्डवर विश्वास करून त्याला सर्वस्व सोपविणे एका तरुणीला मोठे महागात पडले. तिने दूर होताच त्याने तिला ब्लॅकमेल करून तिच्यापासून चार लाख रुपये हडपले. त्याच्याकडून होणाऱ्या मानसिक यातना असह्य झाल्यामुळे अखेर या तरुणीने आरोपी सौरव विश्वनाथ मंडळ (वय २४) याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला.

आरोपी मूळचा बरकपूर कोलकाता येथील रहिवासी आहे. पीडित तरुणी (वय २१) अंबाझरीतील वसतिगृहात राहत होती. जुलै २०१३ मध्ये ते एकमेकांचे फेसबुक फ्रेण्ड बनले. त्यानंतर निरंतर संपर्काने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपी मंडळने तिला रामदासपेठमधील हॉटेल चिदंबरासह विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शरीरसंबंध जोडले. त्याची क्लिपींगही तयार केली.

आणखी वाचा 
महिला शिक्षिकांनीच केले पाचवर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण

हळूहळू त्याचे खरे रूप कळल्यामुळे तरुणी त्याच्यापासून दूर झाली. त्यामुळे आरोपी तिला छळू लागला. त्याने तिला धमकावून रक्कम हडपणे सुरू केले. मुलीचे आईवडील शिक्षणाच्या नावाखाली तिला रक्कम पाठवत होते. मंडळने तीन वर्षात तिच्याकडून चार लाख रुपये हडपले. एवढेच नव्हे तर फोटो अन् क्लिप दाखवून तो तिला नेहमी ब्लॅकमेल करून शरीरसंबंध जोडत होता. बनावट आयडी बनवूनही तो तिला पैशासाठी  त्रास देत होता. पालकांनी वाढवला विश्वासमुलगी वारंवार पैसे मागत असल्याने आईवडिलांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा तिच्या भावनांचा बांध फुटला. तिने दिलेल्या माहितीमुळे हादरलेल्या मातापित्याने नागपूर गाठून तिला आश्वस्त केले. यानंतर पीडित तरुणीने अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्कार, फसवणूक आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली मंडळविरुद्ध गुन्हा दाखल केला.