शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कराचा नव्या सुत्रांनी शिवसेनेच्या तोंडाला फेस

By admin | Updated: June 20, 2016 21:06 IST

एकीकडे मित्रपक्ष भाजपाने कोंडी केली असताना आता पालिका प्रशासनानेही शिवसेनेला अडचणीत आणले आहे़. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २० - एकीकडे मित्रपक्ष भाजपाने कोंडी केली असताना आता पालिका प्रशासनानेही शिवसेनेला अडचणीत आणले आहे़. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीच्या पटलावर आला आहे़. त्यानुसार आता जागेच्या कार्पेटऐवजी बिल्ट एरियानुसार मालमत्ता कराची आकारणी होणार आहे़. यातील नव्या सुत्रानुसार मालमत्तेचा बाजारभाव आणि रेडीरेकनरनुसासर या कराची आकारणी होईल़ ऐन निवडणुकीतील ही करवाढ तोंडाला फेस आणणारी असल्याने शिवसेनेकडून यास विरोध सुरु झाला आहे़.हा प्रस्ताव यापूर्वी ही स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता़ यामध्ये इमारतीच्या बांधीव क्षेत्राची गणना करण्याकरिता घेण्यात आलेला १़२० हा भारांक करता स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरला लागू करण्याचे नवीन सूत्र पालिकेने तयार केले आहे़. मात्र हा भारांक स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरला लागू करण्याऐवजी चटईक्षेत्राला लागू करण्याची मागणी करीत हा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी फेटाळला होता़.जुन्या सुत्रानुसार मालमत्ता करात १२ टक्के घट होणार होती़ त्यावरचा १़२० हा भारांक काढल्यास त्यात आणखी दहा टक्के म्हणजे पालिकेच्या उत्पन्नात एकूण २२ टक्के घट होत होती़. त्यामुळे पालिका प्रशासनाने ज्येष्ठ वकील आणि विधी सल्लागारांचा सल्ला घेतला़ त्यांनी मात्र १़२० हा भारांक स्टॅम्प ड्युटी रेडीरेकनरवर लावण्याचा सल्ला दिला आहे़. त्यामुळे प्रशासनाने नव्या सुत्रांनुसार मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे पुन्हा आणला आहे़. * जुन्या सुत्रामुळे १२०० कोटी रुपयांची कर आकारणी कमी झाली आहे़ करदात्यांचा परतावे द्यावे लागणार आहेत,असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़.* मालमत्ता कराच्या नव्या सुत्रामुळे बिल्ट अप एरियानुसार कर आकारणी होणार आहे़. त्यामुळे मालमत्ताच्या बाजारभावानुसार आणि रेडीरेकनरच्या दरानुसार कर आकारण्यात येणार आहे़. त्यामुळे उपनगरातील मालमत्तांचे दर कमी असल्याने उपनगरात कर कमी व शहरात जादा दर असलेल्या मालमत्तांचा कर अधिक अशी आकारणी होईल, असे समजते़* ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रस्ताव येत असल्याने शिवसेनेत नाराजी आहे़ ही कोंडी फोडण्यासाठी या प्रस्तावाला शिवसेनेकडून कडाडून विरोध केला जाणार आहे़.