शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

दक्षिण मुंबई कॅमेऱ्यांच्या नजरेत

By admin | Updated: December 1, 2015 01:28 IST

दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १३८१ सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाला.

मुंबई : दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १३८१ सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाला. मुंबई स्मार्ट सिटीबरोबरच सेफ सिटी बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२०० कॅमेरे लावण्याचे उद्दिष्ट असताना आज दक्षिण मुंबईत १२८१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मागणीनुसार कॅमेरे वाढविण्यात आले असून, हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत आॅक्टोबर २०१६ असली तरी पावसाळ्यापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदय गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री म्हणाले, २६ नोव्हेंबर २०१६पूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असून, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली येणारे मुंबई हे जगातील पहिले मोठे शहर असेल. कमांड आणि कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षित शहर बनविण्यास प्राधान्य देऊ. लवकरच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्हीचे भक्कम नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या समारंभाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, महापौर स्नेहल अांबेकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त जावेद अहमद उपस्थित होते. या वेळी एल एल अ‍ॅण्ड टी कंपनीचे आर. श्रीनिवासन आणि सीसीटीव्हीची ठिकाणे निश्चित करण्यासाठी मदत केल्याबद्दल माजी पोलीस सह आयुक्त वसंत ढोबळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)सीसीटीव्ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण मुंबई शहरात १५१० ठिकाणी जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले सुमारे ६०२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार. यामध्ये ११५० पीटीझेड कॅमेरे, २० थर्मेल कॅमेरे तर ४८५० फिक्स बॉक्स कॅमेरे असतील. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळीदरम्यानच्या संवेदनशील व महत्त्वाच्या ४३४ ठिकाणी सुमारे १३८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय, मुंबई, वाहतूक मुख्यालय, वरळी आणि नवी मुंबई येथे असेल. दुसऱ्या टप्प्यात उत्तर व पूर्व मुंबईत कॅमेरे बसविणार.