शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

एसीबीचा भ्रष्ट लोकसेवकावर डोळा

By admin | Updated: January 5, 2015 00:54 IST

नुकत्याच संपलेल्या वर्षात १६८१ भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या बांधून अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) राज्य सरकारच्या बहुतांश विभागात अस्वस्थता निर्माण केली आहे. खासकरून महसूल आणि गृह

वर्षभरात १६८१ जण गजाआड : सरकारी यंत्रणा अस्वस्थ नरेश डोंगरे - नागपूरनुकत्याच संपलेल्या वर्षात १६८१ भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या बांधून अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) राज्य सरकारच्या बहुतांश विभागात अस्वस्थता निर्माण केली आहे. खासकरून महसूल आणि गृह (पोलीस) विभागातील सर्वाधिक अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात अडकले. त्यामुळे या दोन विभागात जास्तच अस्वस्थता आहे. अर्जासोबत नोटांचे दर्शन झाल्याशिवाय अर्जदार, तक्रारकर्त्यांच्या कागदाकडे कुणी लक्षच देत नाही. राज्यातील विविध विभागाच्या कार्यालयातील ही स्थिती आहे. भ्रष्ट लोकसेवकांवर कारवाईचा अधिकार असलेली यंत्रणाही ढिम्म असल्यामुळे भ्रष्टाचारी अधिकच निर्ढावल्याची सर्वत्र चर्चा असताना एसीबीने २०१४ मध्ये आक्रमक सक्रियता दाखवून भ्रष्टाचाऱ्यांमधील निर्ढावलेपणा कमी करण्यात अंशत: का होईना यश मिळवले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१४ या वर्षभरात एसीबीने राज्यभरातील भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध १२४५ सापळे यशस्वी केले. विविध पोलीस ठाण्यात एकूण १३१६ गुन्हे दाखल केले आणि १६८१ भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या बांधल्या. यातील सर्वाधिक ४३२ अधिकारी-कर्मचारी महसूल विभागातील आहेत. पोलीस विभागातील ४१२, ग्रामविकास खात्यातील १९९, नगरविकास १२९, शिक्षण विभाग ७९, आरोग्य विभाग ५८, वीज कंपनी ६८, पाटबंधारे २३, वन विभाग २३ तसेच सहकार आणि पणन विभागातील २४ लोकसेवक एसीबीने गजाआड केले. २०१३ मध्ये केवळ ५८३ सापळे यशस्वी झाले होते. अर्थात, २०१४ मध्ये दुपटीपेक्षा जास्त सापळे एसीबीने यशस्वी केले. डॉक्टर, वकील आणि गुरुजीसुद्धा!लाच घेताना रंगेहात पकडल्या गेलेल्यांमध्ये ८७ अभियंते, ३० डॉक्टर, १२ वकील आणि थोडेथोडके नव्हे तर ३० शिक्षकांचा (गुरुजी) समावेश आहे. भ्रष्टाचाराची प्रचंड ओरड असूनही प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) अधिकारी मात्र एसीबीला सापडले नाही. त्यामुळे यावर्षी आरटीओवर एसीबीची खास नजर राहणार आहे.