शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांना अखेर वेतन मिळणार

By admin | Updated: January 9, 2017 05:03 IST

राज्यातील ४ हजार अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या नवीन शाळांत समायोजन करण्यात आले असेल

मुंबई : राज्यातील ४ हजार अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या नवीन शाळांत समायोजन करण्यात आले असेल, त्या शाळांकडे अतिरिक्त शिक्षकांचे वेतन देण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे नवीन शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही शाळांनी शिक्षकांचे समायोजन करून घेतले नव्हते, तर काही शाळांनी समायोजन करून घेतले, तरी शिक्षकांचे वेतन नवीन शाळांमध्ये जात नव्हते. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. जुन्या शाळेत शिक्षकांचे वेतन पाठवण्यात येत नव्हते आणि नवीन शाळांमध्येही शिक्षकांचे वेतन पाठवण्यात येत नसल्याने शिक्षकांचे नुकसान होत होते. अखेर नवीन शाळेत शिक्षकांचे वेतन दिले पाहिजे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे शाळेत समायोजन प्रक्रिया पूर्ण होणार होती. त्यामुळे आताही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या रिक्त पदी समावेश करून त्यांचे वेतन सुरळीत होणे आवश्यक आहे. ज्या शाळेतून अतिरिक्त शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्या शाळेच्या वेतनातून संबंधित शिक्षकाचे नाव काढून टाकून, दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. त्या शाळेच्या वेतन देयकात जोडण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी. ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचे काम थांबवण्याची आवश्यकता नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त शिक्षकास नवीन शाळेचे मुख्याध्यापक रूजू करून घेत नसल्यास, संबंधित मुख्याध्यापकांची तक्रार करू शकतात. या मुख्याध्यापकांवर आणि शाळेवर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)