शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे वेतन होणार आॅनलाईन

By admin | Updated: July 10, 2016 19:40 IST

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता लवकरच आॅनलाईन पद्धतीने होणार

शासन आदेशाने शिक्षक संघटनांत जुंपलीमुंबई : राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमधील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आता लवकरच आॅनलाईन पद्धतीने होणारआहे. वेतन आॅनलाईन होण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी तत्काळ सुविधा कार्यान्वित करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाचे श्रेय लाटण्यासाठी शिक्षक संघटनांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

याआधी अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आॅफलाईन पद्धतीने वेतन काढण्याची मुदत जूनमध्ये संपली होती. शासन निर्णयात त्यात वाढ करण्यात आली असून डिसेंबर २०१६ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तयांनी आॅनलाईन पद्धतीने वेतन अदा करण्याची सुविधा तत्काळ कार्यान्वित करण्याची सूचनाही शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

त्यामुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार आहे.अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आॅनलाईन वेतनासाठी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला होता, असे शिक्षक परिषदेचे मुंबई अध्यक्ष अनिल बोरनारे यांचे म्हणणे आहे. बोरनारे यांनी सांगितले की, अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आॅनलाईन वेतनासाठी १० आॅगस्ट २०१५, २६ जून २०१६ आणि ४ जुलै २०१६ रोजी शिक्षक परिषदेने पत्रे पाठवली आहेत. तसा पुरावाही संघटनेकडे आहे.

याउलट शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी आॅफलाईन वेतनाची मागणी विधानपरिषदेच्या सभागृहात केल्याचा आरोप शिक्षक भारतीचे कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केला आहे. सरोदे म्हणाले की, शिक्षक परिषद आणि रामनाथ मोतेयांनी केलेल्या आॅफलाईन वेतनाच्याय मागणीला शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोल बेलसरे यांनी विरोध केला होता. शिवाय आॅनलाईन वेतनाची मागणी धरून ठेवली होती. त्यावेळी अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर या मागणीचा विचारकरू, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. त्यामुळे उशीरा का होईना शिक्षक भारतीची मागणी शासनाने मान्य केली आहे, असेही सरोदे यांनी सांगितले.