शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यासाठी जादा दर; परवाना होणार निलंबित

By admin | Updated: June 21, 2016 03:23 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते

अकोला : दुष्काळी परिस्थितीमुळे ‘महाबीज’च्या तूर, मूग व उडीद बियाण्यांची दरवाढ न करता, त्याची गतवर्षीच्या दरानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला. तरीही काही विक्रेते जादा दराने बियाणे विक्री करीत असल्याचे ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून सोमवारी उघडकीस आणले होते. त्याची दखल घेत, मुजोर विक्रेत्यांचा परवाना निलंबित करण्याचा इशारा जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)चे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिला. अकोल्यातील ‘महाबीज’ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २०१६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याने कडधान्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी खरीप हंगामातील महाबीजचे तूर, मूग व उडीद बियाणे मागील वर्षीच्या दरानुसार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील महाबीजच्या सर्व विक्रेत्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यानुसार विक्रेत्यांनी मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्री करणे बंधनकारक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बियाणे दुकानांची तपासणी करण्यात येणार असून, जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मागील वर्षीच्या दराने बियाणे विक्रीच्या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांची बियाणे खरेदी झाली आहे. त्यामुळे बियाण्याच्या फरकाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.त्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे बियाण्याची पावती, टॅग व बँक खाते क्रमांक सादर करणे आवश्यक आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले. तसेच ही रक्कम जमा करण्यासाठी शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लावल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.