शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

मिरचीचे भरघोस उत्पादन

By admin | Updated: July 22, 2016 02:26 IST

कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग वडगाव घेनंद (ता. खेड) येथील शेतकरी पांडुरंग बुधाजी बवले यांनी करून दाखविला आहे

भानुदास पऱ्हाड,

शेलपिंपळगाव- कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग वडगाव घेनंद (ता. खेड) येथील शेतकरी पांडुरंग बुधाजी बवले यांनी करून दाखविला आहे. त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या १२ गुंठे क्षेत्रात मिरची या पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड केली असून, पिकाच्या उत्पादनातून हजारो रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे. दीड महिन्यांच्या कालावधीत मिरचीच्या पहिल्या तीन तोड्यांमध्ये ५० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, पीक समाप्तीपर्यंत बाजारभावात चढउतार जरी झाला, तरीसुद्धा १ लाख रुपयांच्या उत्पन्नाची आशा उत्पादक शेतकरी बाळगून आहे. उच्चांकी बाजारभाव व पिकाच्या उत्पादनापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहावयास मिळत आहेत. साधारण दीड महिन्यापूर्वी बारा गुंठ्याच्या मध्यम प्रतीच्या जमिनीत ‘बेड’वर मल्चिंग पेपर आच्छादन करून तीन हजार मिरचीच्या रोपांची लागवड करून ड्रीपद्वारे पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यवस्थित स्थिर होऊन पीक जोमात वाढले. दीड महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा पाण्याद्वारे ड्रीपच्याच साह्याने देत राहिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. परिणामी मिरच्यांच्या झाडाला रोगमुक्त फुले येऊन झाडाला फळ आले. सध्या पीक परिपक्व होऊन तोडणीलायक झालेले आहे. मजुरांच्या साह्याने दिवसाआड पिकाची दोनशे ते अडीचशे किलो तोडणी करून चाकण, आळंदी, खडकी येथील बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून, पिकाला बाजारात प्रतिदहा किलोला ११०० ते १३०० रुपये असा उच्चांकी भाव प्राप्त होत असल्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या कष्टाचे चीज होत आहे. मिरची पिकाच्या संगोपनासाठी १६ हजार रुपयांचा खर्च आला असला तरीसुद्धा पिकापासून अडीच महिन्यांच्या कालखंडात खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे हमखास उत्पन्न प्राप्त होणार आहे. >‘आम्ही उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी कृषिमित्र सतीश गांधिले, संतोष बवले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरचीची लागवड केली होती. चालू वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाने ओढ दिल्याने बहुतांशी भागात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला होत आहे.- जीवन बवले, शेतकरी