शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ नसलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2017 02:52 IST

अंदाजित अंदाजपत्रकामध्ये मागील वर्षाची शिल्लक धरून २७ कोटी ४८ लाख ५१ हजार ९९५ रुपयांची एकूण जमा रक्कम आहे.

पेण : पेण नगरपरिषदेचा सन २०१७-१८च्या अंदाजित अंदाजपत्रकामध्ये मागील वर्षाची शिल्लक धरून २७ कोटी ४८ लाख ५१ हजार ९९५ रुपयांची एकूण जमा रक्कम आहे. सन २०१७-१८च्या सुधारित अंदाजपत्रक २३ कोटी ५१ लाख ६८ हजार २९६ रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी पेण नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात कोणीतीही करवाढ केलेली नसून नाट्यगृहाचे उर्वरित बांधकाम व अन्य सुविधा, तसेच दलित वस्ती सुधारण्यासाठी दोन्ही घटकांवर प्रत्येक १ आणि २ कोटी रुपयांची तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा असा सर्वसमावेशक, अर्थसंकल्प करण्यावर भर दिला आहे. तर वर्षाखेर १ कोटी ४० लाख ५ हजार ३३८ची शिल्लक राहणार, असे अंर्थसंकल्पात नमूद केले आहे.याप्रसंगी पालिका गटनेते अनिरुद्ध पाटील, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, विषय समित्यांचे सभापती व सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन व वसुली खर्च ४ कोटी ४६ लाख २४ हजार ५३० रुपये, सार्वजनिक सुरक्षितता अंतर्गत १ कोटी २६ लाख १० हजारांची तरतूद, विशेष बाब म्हणून आरोग्य व सुखसोयी यांच्यावर सर्वाधिक १० कोटी ५६ लाख ३२ हजार ५०७ रुपयांची तरतूद, तर शिक्षणावर २८ लाख ५० हजारांची तरतूद केली आहे. वरील प्रमुख चार घटकांमध्ये पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गटारे, स्मशानभूमी, रस्ते व फायरब्रिगेडसह जलतरणावर खर्चाची तरतूद आहे.२०१७-१८ विशेष बाबीच्या तरतुदीमध्ये पेणच्या नाट्यगृहाच्या बांधकामावर १ कोटींच्या तरतुदीने तिसरी घंटा यावर्षी वाजणार आहे. तसेच दलित वस्ती सुधारणा अंतर्गत समाज मंदिर उभारणी व इतर सोयी-सुविधांवर १ कोटींची तरतूद केलेली आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून स्टेडियमच्या गॅलरीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख, नगरोत्थान अभियानांतर्गत आगरी समाज हॉल येथील रस्ता नव्याने बनविणे, बांधा-वापरा हस्तांतरित करा तत्त्वावर भाजी मार्केट व पाणीपुरवठा टप्पा क्र. २ योजना पूर्णत्वास नेणे या अत्यावश्यक योजनेचा समावेश विशेष तरतुदीमधील महत्त्वपूर्ण कामे असा करण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्यानंतरच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करून शासन दरबारी पाठविण्याचा पालिकेचा मनसुबा आहे. याशिवाय आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० लाख अंध-अपंगासाठी १४ लाख व महिला बाल कल्याणसाठी १० लाखांची तरतूद आहे. एकंदर सर्वच घटकांसहित नाट्यगृह पाणीपुरवठा टप्पा क्र. २ व आरोग्य व सुखसोईसाठी साडेदहा कोटींची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकलेला नाही म्हणून सर्वसमावेशक अर्थसंकल्पाची अंमलबजावणीही प्रभावीपणे केली पाहिजे. (वार्ताहर)>नगरपरिषदेची तरतूद४ कोटी ४६ लाख सामान्य प्रशासन व वसुली१ कोटी २६ लाखसार्वजनिक सुरक्षितता१० कोटी ५६ लाख आरोग्य व सुखसोयी२८ लाख ५० हजारशिक्षणवरील प्रमुख चार घटकांमध्ये पथदिवे, पाणी शुद्धीकरण, जंतुनाशके, गटारे, स्मशानभूमी, रस्ते व फायरब्रिगेडसह जलतरणावर खर्चाची तरतूद आहे.२०१७-१८ विशेष बाबीच्या तरतुदीमध्ये पेणच्या नाट्यगृहाच्या बांधकामावर १ कोटींच्या तरतुदीने तिसरी घंटा या वर्षी वाजण्याची शक्यता.