शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी

By admin | Updated: March 5, 2017 04:43 IST

मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी

पुणे : मॉन्सून चांगला झाल्याने यंदा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून १४.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठी असल्याने, यंदा पाणी टंचाईच्या झळा पुणेकरांना बसणार नाहीत. तसेच जिल्ह्यातील उजनी धरणासह, कोयना, राधानगरी, वारणा, धोम या प्रमुख धरणातील पाणी पातळी देखील सरासरी ५० टक्के असल्याने पश्चिम महाराष्ट्राला एप्रिल-मे महिन्यात पाणीबाणी जाणवणार नाही. चांगल्या मॉन्सूनमुळे भिमा खोऱ्याबरोबरच कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणांत निम्मा पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या डिंभे धरणात ६.१९ टीएमसी (४९.५६ टक्के), भामा-आसखेड ४.७९ (६२.४६), चासकमान २.७९ (३६.८९) आणि पवना धरणात ४.७२ टीएमसी (५५.४५) पाणीसाठा आहे. गुंजवणी १.०३ (४७.५६ टक्के), निरा देवधर ४.७२ (४०.२३), भाटघर १०.३४ (४४) आणि वीर धरणात ७.२८ टीएमसी (७७.३८) पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उजनी धरणातही २८.२२ टीएमसी (५२.६७ टक्के) पाणीसाठा आहे. राज्यासाठी वीज निर्मिती आणि सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या कोयना धरणात तब्बल ४९.९५ टीएमसी (४९.८९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. वारणा धरणात १६.१५ (५८.६८), राधानगरी ३.७२ (४७.८७), दूधगंगा १४.६४ (६१) आणि ऊरमोडी धरणांत ७.८८ टीएमसी (८१.६८) पाणी शिल्लक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख धरणांत मुबलक पाणी उपलब्ध असल्याने, यंदा उन्हाची तीव्रता वाढली तरी पिण्याच्या पाण्याची टंचाईची फारशी जाणवणार नसल्याचे चित्र आहे. - पुणे शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून पाणी पुरवठा होता. या धरणांची क्षमता २९ टीएमसी असून, सध्या त्यात १४.३९ टीएमसी पाणीसाठा आहे. वरसगावमध्ये ५.६३ (४३.९० टक्के), पानशेत ७.३८ (६९.२५) व खडकवासला धरणात १.३२ टीएमसी (६६.८४) पाणीसाठा आहे. गळतीमुळे टेमघर धरणाची दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी तेथील पाणीसाठी ०.०७ टीएमसीपर्यंत (१.७७ टक्के) खाली करण्यात आला आहे. या चारही धरणांत मिळून तब्बल ४९.३५ टक्के पाणीसाठा असल्याने, यंदा शहराला उन्हाळ््यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. गेल्यावर्षी खडकवासला प्रकल्पातील या चारही धरणांत मिळून केवळ ८.०५ टीएमसी (२७.६१ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.