शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ- फुंडकर

By admin | Updated: April 17, 2017 03:02 IST

नाफेड’मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांना आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा कृषीमंत्री पांडुंरंग फुंडकर यांनी केली

वाशिम : ‘नाफेड’मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांना आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा कृषीमंत्री पांडुंरंग फुंडकर यांनी केली. राज्यातील ३०० खरेदी केंद्रांवर आतापर्यंत सुमारे ३३ लाख क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्याने हा निर्णय घेण्यात आला.कारंजा येथे एका खासगी कृषी बाजारच्या उद्घाटनप्रसंगी फुंडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत होते. यावेळी फुंडकर म्हणाले की, नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्रांची मुदत शनिवार संपणार होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी तूर खरेदीची मुदत आणखी सात दिवस वाढवून देत आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी टोकन देण्यात आले त्यांची मोजणी प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोजणी झाल्यानंतर नव्याने आलेल्या तुरीचा विचार होईल. काही व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारचा विरोध नाही. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)