शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

निविदा भरण्यास मुदतवाढ : सिडकोचा निर्णय

By admin | Updated: January 10, 2017 00:55 IST

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारायच्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी ठरलेल्या मुदतीत एकमेव निविदा आल्याने ‘सिडको’ने निविदा

मुंबई : मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारायच्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी ठरलेल्या मुदतीत एकमेव निविदा आल्याने ‘सिडको’ने निविदा भरण्यासाठी आणखी दोन आठवडे मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.हे नवे विमानतळ उभारून त्याचे परिचालन करण्याच्या कामासाठी ‘सिडको’ने इच्छुकांकडून निविदा मागविल्या होत्या. यासाठी सोमवारी दुपारी ३पर्यंत मुदत होती. तोपर्यंत मुंबई विमानतळाचे परिचालन करणाऱ्या ‘जीव्हीके ग्रुप’ची एकमेव निविदा प्राप्त झाली. त्यामुळे त्यांची वित्तीय निविदा न उघडता मुदत वाढविण्याचे ठरविण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.इतर इच्छुकांना निविदा दाखल करण्याची संधी मिळावी व असमर्थता दर्शविणाऱ्या तीन कंपन्यांना फेरविचार करण्यास वेळ मिळावा यासाठी आलेली एकमेव निविदा न उघडता आणखी मुदत देण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. निविदा स्पर्धात्मक असाव्यात व त्याद्वारे उत्तम अटी व शर्तींवर विमानतळाचे काम व्हावे, हाही यामागचा हेतू आहे. मुदतवाढ दिल्याने जीव्हीके ग्रुपलाही सुधारित निविदा दाखल करण्याची संधी मिळेल.जीएमआर ग्रुप सध्या दिल्ली व हैदराबाद विमानतळांचे परिचालन करते. शिवाय गोव्यातील दुसरा विमानतळ उभारण्याचे कामही अलीकडेच त्यांना मिळाले आहे. कंपनीने सरकारला पत्र लिहून नवी मुंबई विमानतळाच्या कामातील अनेक अडचणींकडे लक्ष वेधले होते. या सर्वांचा विचार करूनच निविदांचे प्रारूप तयार केले गेले होते. ‘सिडको’ ही केवळ हे काम करून घेणारी संस्था असल्याने निविदांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यासाठी या कामावर देखरेख करण्यास सरकारने नेमलेल्या समितीपुढे हा विषय न्यावा लागेल. तसे केल्यास आधीच विलंब झालेले हे काम आणखी रखडेल. (विशेष प्रतिनिधी)याआधी ‘सिडको’ने निविदापूर्व पात्रता बैठक घेतली होती, तेव्हा ‘जीव्हीके ग्रुपखेरीज जीएमआर ग्रुप, टाटा रिअ‍ॅलिटी व हिरानंदानी ग्रुप व झ्युरिच एअरपोर्ट यांची संयुक्त कंपनी पात्र ठरली होती. मात्र प्रकल्प पूर्ण होण्यातील अनेक संभाव्य अडचणी व निविदेमधील कठोर अटींचे कारण देत टाटा, जीएमआर व हिरानंदानी यांनी निविदा भरण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले होते.