शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
2
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
3
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
4
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
5
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
6
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
7
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
8
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
9
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
10
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
11
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च
12
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
13
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
14
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
15
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
16
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
17
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
18
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
19
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
20
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर

By admin | Updated: August 8, 2015 01:51 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजपाच्या वाट्याला जेमतेम तीन ते चार मंत्रीपदे येणार असून, उर्वरित सहा ते सात मंत्रीपदे शिवसेना आणि भाजपाच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत

संदीप प्रधान, मुंबईराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजपाच्या वाट्याला जेमतेम तीन ते चार मंत्रीपदे येणार असून, उर्वरित सहा ते सात मंत्रीपदे शिवसेना आणि भाजपाच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत. भाजपाच्या वाट्याच्या अत्यल्प मंत्रीपदाकरिता किमान १५ ते २० इच्छुक असल्याने भाजपा मंत्रिमंडळ विस्ताराकरिता फारसा उत्सुक नसून तसे त्यांनी शिवसेनेला कळविल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ती चर्चा फुसका बार ठरली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी पुढील अधिवेशनापूर्वी, असे उत्तर देऊन भाजपाला सध्या विस्तारात रस नसल्याचे संकेत दिले. सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रीपदे रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी आणि शिवसंग्राम या पक्षांना द्यावी लागतील. शिवसेनेला तीन मंत्रीपदे दिल्यावर भाजपाकडे केवळ तीन मंत्रीपदे राहतात. याकरिता पांडुरंग फुंडकरांपासून शोभाताई फडणवीसांपर्यंत आणि आशिष शेलार यांच्यापासून राज पुरोहित यांच्यापर्यंत किमान १५ ते २० जण इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री व भाजपा फारसे उत्सुक नाहीत व तसे संकेत प्राप्त झाले आहेत.