शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी मुदतवाढ

By admin | Updated: June 22, 2016 04:20 IST

राज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीची मुदत १५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

मुंबई : राज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीची मुदत १५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यासाठी आता अध्यादेश काढण्यात येणार आहे. आघाडी सरकारने नेमलेल्या डॉ.नरेंद्र जाधव समितीने नवीन महाविद्यालयांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे म्हटले होते. त्यानुसार २०१६-१७ मध्ये परवानगी हवी असलेल्या संस्थांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत शासनाकडे अर्ज केले होते. अर्जातील त्रुटी दूर करण्याची संधी या संस्थांना दिली जाते. या त्रुटी दूर करून परवानगी मिळविण्यासाठी १५ जूनपर्यंतची मुदत कमी पडते, असा सर्वच अर्जदार संस्थांचा सूर होता. (विशेष प्रतिनिधी)इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेने तशी मागणी केली होती. आजच्या निर्णयामुळे या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे शासनाला शक्य होणार आहे. रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.३५० खाटांचे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शासनाला शक्य होणार आहे.ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जाराज्यातील ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी (झोराष्ट्रीयन) व जैन धर्मियांना आधीपासूनच हा दर्जा आहे. हा दर्जा देण्याची मागणी इंडियन ज्युईश फेडरेशनने शासनाकडे केली होती. ज्यू धर्मियांची राज्यातील लोकसंख्या दोन ते अडीच हजार आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील ज्यू धर्मीय लोकसंख्येची गणना करणे शक्य होणार आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ ज्यू धर्मीयांना घेता येणार आहे.