शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’च्या संचालकांच्या जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: June 20, 2016 22:12 IST

गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणखीण ३ कोटी रुपये इस्क्रो खात्यात

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २० - गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणखीण ३ कोटी रुपये इस्क्रो खात्यात जमा केले असून न्यायाधीश एम़एच़मोरे यांनी या दोघांच्याही जामीनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे़. दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल न केलेले एजंट व महिला गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी करून सत्पाळकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला़. मात्र, महिलांचा रोष पाहाता पोलिसांनी सत्पाळकरांना दुसऱ्या दरवाज्याने न्यायालयाबाहेर काढले़. गुंतवणुकीची मुदत पूर्ण होऊनही आर्थिक परतावा न दिल्याने मैत्रेय कंपनीचे संचालक सत्पाळकर व परुळेकर या दोघांविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे़. न्यायालयाने या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करून बँकेत संयुक्त खाते इस्क्रोमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत़. त्यानुसार मागील सुनावणीच्या वेळी कंपनीने या खात्यात अडीच कोटी रुनये जमा केले होते़ दरम्यान पोलिसांकडील तक्रारदारांमध्ये वाढ होऊन फसवणुकीची रक्कम सहा कोटींपर्यंत पोहोचली आहे़. मैत्रेयने तक्रारदारांच्या परताव्याच्या रकमेनुसार इस्क्रो खात्यात पैसे जमा करावे यासाठी पोलिसांनी प्रयत्नशील होते़. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार १९ जूनपर्यंत अधिकाधिक रक्कम पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते़. यानुसार कंपनीने सोमवारी (दि़२०) ३ कोटी रुपयांचा भरणा केल्याने या खात्यात आतापर्यंत ५ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे़ मैत्रेयने ही रक्कम इस्क्रो खात्यात जमा केली नसती तर न्यायालयाने या दोघांचेही जामीन रद्द केले असते़. (प्रतिनिधी)सत्पाळकर मागच्या दरवाज्याने बाहेरमैत्रेयच्या संचालकांनी दिलेल्या आश्वासनावर पोलिसांत तक्रार दाखल न केलेल्या महिला व पुरुष गुंतवणूकदारांनी वर्षा सत्पाळकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी न्यायालयात गर्दी केली होती़. मात्र, पोलिसांनी गुंतवणूकदारांचा रोष पाहाता वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करून सत्पाळकरांना न्यायालयात हजर केले़. यानंतर गुंतवणूकदारांनी सत्पाळकरांशी बोलण्याबाबत विचारणा केली असता पोलिसांनी ते फेटाळून लावली़ तसेच सुनावणीनंतर दुसऱ्या दरवाजाने बाहेर काढले़. मैत्रेयवर अजुनही विश्वास़मैत्रेयकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ़सीताराम कोल्हे यांनी केले होते़. मात्र तरीही सत्पाळकरांवर विश्वास असलेल्या बहुतांशी एजंटांनी आपल्या गुंतवणूकदारांना तक्रार करण्यापासून रोखले होते़. त्यातच सांचालकांनी केवळ तक्रारदारांचेच पैसे परत करण्याबाबत बांधील असल्याचे न्यायालयात सांगितल्याने तक्रार न केलेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी केली होती़ तसेच केवळ एक मिनिट बोलू द्या अशी विनंती पोलिसांकडे केली मात्र, ती फेटाळण्यात आली़.