शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कागदपत्र सादर करण्यास अर्जदारांना मुदतवाढ

By admin | Updated: September 11, 2015 03:17 IST

म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढीनुसार विजेत्यांना

मुंबई : म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढीनुसार विजेत्यांना २२ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असल्याने विजेत्यांना दिलासा मिळाला आहे.म्हाडाने ३१ मे रोजी १ हजार ६३ घरांची लॉटरी काढली. मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना अ‍ॅक्सिस बँकेत कागदपत्रे जमा करण्यासाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतरही सुमारे ७५0 विजेत्यांनी अद्यापपर्यंत कागदपत्रे जमा केली आहेत. विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानुसार २२ सप्टेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करता येणार आहेत. विजेत्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची छाननी होणार आहे. या छाननीनुसार विजेत्यांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर मंडळामार्फत घर ताब्यात देण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत कोकण मंडळाच्या काही घरांचा समावेश होता. परंतु, कोकण मंडळाकडून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्याबाबत कळविलेले नाही. त्यामुळे कोकण मंडळाची कागदपत्रे जमा करण्याची मुदत लांबणीवर जाणार आहे.