शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेम व्यक्त करणे लैंगिक छळ नव्हे’

By admin | Updated: November 12, 2016 03:27 IST

एखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्याचे जाहीर करणे किंवा त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे, असा आग्रह धरणे ही कृती लैंगिक उद्देश असल्याशिवाय लैंगिक छळाच्या व्याख्येत मोडत नाही

राकेश घानोडे, नागपूरएखाद्या व्यक्तीवर प्रेम असल्याचे जाहीर करणे किंवा त्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम करावे, असा आग्रह धरणे ही कृती लैंगिक उद्देश असल्याशिवाय लैंगिक छळाच्या व्याख्येत मोडत नाही, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.एका प्रकरणात संशयिताला सत्र न्यायालयामध्ये लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण अधिनियम-२०१२मधील कलम १२ (लैंगिक छळ) अंतर्गत दोषी धरण्यात आले होते. या कायद्यातील कलम ११मध्ये लैंगिक छळाविषयी स्पष्टीकरण दिले आहे. उच्च न्यायालयाने ही तरतूद लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. या तरतुदीनुसार लैंगिक उद्देशाने केलेली कृती लैंगिक छळामध्ये मोडते.उच्च न्यायालयाने निर्णयामध्ये लैंगिक उद्देशासंदर्भात ऊहापोह केला आहे. उद्देश ही मनाची एक अवस्था आहे. दुसऱ्याच्या डोक्यात शिरून तो काय विचार करीत आहे, हे समजून घेता येत नाही. परंतु, घटनेच्या वेळी असलेली परिस्थिती व प्रकरणातील तथ्यांच्या आधारावर उद्देशाचा अंदाज बांधता येतो. शब्द, हालचाल, हातवारे, प्रतिक्रिया व इतर शारीरिक प्रगटीकरणावरून संबंधित व्यक्तीच्या मनातील विचारांचे आकलन केले जाऊ शकते, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.असे आहे प्रकरणबंडू विठ्ठल बोरवार (२२) असे आरोपीचे नाव असून, तो मोर्शी येथील रहिवासी आहे. ३० आॅगस्ट २०१३ रोजी शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून ‘तू माझ्यावर प्रेम का करीत नाही,’ अशी विचारणा केली. या प्रकरणी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.