शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ

By admin | Updated: July 18, 2016 04:38 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.

विवेक भुसे,

पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवळ तीन महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांनी टोल वसुलीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.विशेष म्हणजे टोल कंपनी वाहनांची संख्येत फेरफार करते, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आणि टोलचा पाठपुरावा केल्यानंतर आलेली नवी आकडेवारी काहीशी समाधानकारक आहे.आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये १३ लाख वाहने वाढली होती़ मात्र, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल ६१ लाख वाहने वाढली असल्याचे दिसून येत आहे़ तसेच एप्रिल ते जूनमध्ये १३३ कोटी ७९ लाख ५२ हजार ४१३ रुपये टोल वसुली झाली. मागीलवर्षी याच काळात ११३ कोटी १६ लाख २० हजार २४४ रुपयांचा टोल वसूल झाला होता़२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची माहिती आयआरबी कंपनीने सादर केली असून त्यात आजवरची सर्वाधिक वाहनसंख्या आणि टोल वसुलीतील वाढ दिसून आली आहे़ एक्स्प्रेस वे तसेच इतर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. परिणामी टोलची रक्कमही कमी दाखविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. पुणे -कोल्हापूर मार्गावरील किणी टोलनाक्यावर दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेली पाहणी आणि टोल कंपनीने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत मोठा फरक आढळला होता.आता तर टोल बंद करा!टोलवसुली करणाऱ्या कंपनीनेच उपरोक्त आकडेवारी दिली असल्याने ती खरी असणाऱ टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़ माहिती अधिकार कायद्याच्या बडग्यामुळे ही माहिती गेल्या वर्षी पुढे आली, तेव्हापासूनच टोल बंद झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे़- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंचराज्य शासनाने माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांना अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितले होते़ त्यांनी शासनाला अहवाल दिला असून टोलमुक्तीसाठी काय करता येईल, याचा कृती अहवाल शासन तयार करीत आहे़