खालापूर : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी सकाळी आडोशी गावाजवळ दोन बसचा अपघात झाला. त्याच एक ठार, तर नऊ जण जखमी झाले. पूजा माने (२०, रा. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. राज्य परिवहन मंडळाची शिवनेरी बस मुंबईकडे भरधाव जात होती. टायर फुटल्याने ती पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला धडकली. या अपघाताची महामंडळकडून संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. (वार्ताहर)जखमींवर खोपोलीतील जाखोटिया व पनवेलमधील पॅनाशिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोपोली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातग्रस्त शिवनेरी बस ही साई ट्रॅव्हल्स पुणे यांच्यामार्फत चालविण्यात येत होती. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाइकांना आर्थिक भरपाई संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीकडून मिळू शकते. मुळात एसटी महामंडळ चालवत असणाऱ्या शिवनेरी बसेसवर प्रशिक्षित वाहनचालक आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी आहे. नेमका अपघात का घडला, संबंधित साई ट्रॅव्हल्सचा वाहनचालक प्रशिक्षित होता का, याची चौकशी केली जाईल. - अजित गायकवाड, विभाग नियंत्रक रायगड
‘शिवनेरी’ला एक्स्प्रेस-वेवर अपघात; १ ठार
By admin | Updated: October 8, 2015 04:00 IST