शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

‘एसएनडीएल’ला हद्दपार करा!

By admin | Updated: January 26, 2015 00:55 IST

नागपूर शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाल्याने या कंपनीकडून

आमदार-नगरसेवकांची मागणी : पालकमंत्र्यांनी दिले आॅडिट करण्याचे आदेशकोराडी : नागपूर शहराला वीजपुरवठा करण्याचे कंत्राट ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे सामान्य ग्राहक त्रस्त झाल्याने या कंपनीकडून वीजपुरवठ्याचे कंत्राट काढून घेण्यात यावे, अशी मागणी नागपूर शहरातील चार आमदार, महापौर व नगरसेवकांनी केली आहे. त्यातच या कंपनीचे तीन वर्षांचे प्रशासकीय आॅडिट करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. कोराडी वीज प्रकल्पाच्या विश्रामगृहात रविवारी पार पडलेल्या बैठकीत सदर मागणी करण्यात आली. या प्रसंगी पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके, सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, अर्चना डेहनकर यांच्यासह नगरसेवक, ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ तसेच महानिर्मिती व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदारांसह नगरसेवकांनी ‘स्पॅन्को-एसएनडीएल’च्या कार्यप्रणालीमुळे निर्माण झालेल्या तक्रारींचा पाढा वाचला. वीज कंपनीने ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ला देखभालीसाठी ३६ कोटी रुपये दिले. त्यात कोणती कामे करण्यात आली, ते तपासा, ‘स्पॅन्को-एसएनडीएल’ने रात्रीच्यावेळी किंवा पूर्वसूचना न देता धाडी टाकू नये, यासाठी महावितरणची परवानगी घ्यावी, मागणीनुसार सबमीटर द्यावे यासह अन्य समस्या उपस्थित करण्यात आल्या. ग्राहकांना अवाजवी बिल पाठविले जाते. त्यात वीज आकारणी रकमेपेक्षा अधिभाराची रक्कम अधिक असते. मीटर बदलविण्याच्या नावावर ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप. आ. देशमुख यांनी केला. गरज नसताना मीटर बदलविण्यात येत असून, त्यासाठी अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप महापौर दटके यांनी केला. या सर्व समस्यांचे निराकरण १५ दिवसांत करावे, शहरातील सर्व कार्यालये पूर्ववत सुरू करावे, तीन वर्षांचे आॅडिट करण्याचे आदेश बावनकुळे यांनी ‘स्पॅन्को-एसएनडीएल’च्या अधिकाऱ्यांना दिले. यात सुधारणा न झाल्यास नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मीटरची व्हीएनआयटीकडून तपासणी करावी, मीटर बदलविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, असे आदेश बावनकुळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता मोहन झोड यांना दिले. (वार्ताहर)